Anandrao Patil Met BJP state President Chandrashekhar Bawankule esakal
सातारा

Karad Politics : लवकरच तुमच्या मनात आहे ते होईल; माजी आमदाराचं सूचक वक्तव्य, भाजपवासी होण्याची शक्यता

आमदार चव्हाण यांच्याशी व त्यांच्या कुटुंबाशी पहिल्यापासून आनंदराव पाटील (Anandrao Patil) हे एकनिष्ठ राहिले.

हेमंत पवार

मध्यंतरी पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दरम्यान लवकरच तुम्हाला नवीन बातमी देऊ, असे सूचक वक्तव्य केले होते.

कऱ्हाड : माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचे समर्थक असलेले माजी आमदार आनंदराव पाटील हे त्यांच्यापासून दुरावले आहेत. त्यांनी मागील विधानसभा निवडणुकीपासून भाजपचे अतुल भोसले (Atul Bhosale) यांना साथ दिली आहे.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्या कऱ्हाड दौऱ्यात श्री. पाटील यांनी त्यांची आज भेट घेऊन चर्चा केली. त्यामध्ये काय चर्चा झाली, हे स्पष्ट करण्यात आले नसले तरी त्यांनी हो...हो त्याचीच चर्चा आज झाली. लवकरच तुमच्या मनात आहे ते होईल, असे सांगून ते भाजपवासी होणार असल्याचेच यातून स्पष्ट केले. त्याचीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

आमदार चव्हाण यांच्याशी व त्यांच्या कुटुंबाशी पहिल्यापासून आनंदराव पाटील (Anandrao Patil) हे एकनिष्ठ राहिले. मात्र, मध्यंतरी काही घडामोडी घडल्या. त्यातून पाटील हे आमदार चव्हाण यांच्यापासून दूर गेले ते गेलेच. पुन्हा आता त्या दोघांतील संबंध सुधारतील, असे चित्र नाही. त्यामुळे पाटील यांनी मागील विधानसभा निवडणुकीपासून भाजपचे अतुल भोसले यांना साथ देण्यास सुरुवात केली आहे.

मध्यंतरीच्या जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत पाटील यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांना साथ दिली. बाजार समितीसह अन्य काही निवडणुकीत त्यांनी भाजपच्या भोसले गटाला साथ दिली. दरम्यान, मध्यंतरी पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या दरम्यान लवकरच तुम्हाला नवीन बातमी देऊ, असे सूचक वक्तव्य केले होते. दरम्यान, काल आणि आज श्री. बावनकुळे हे कऱ्हाडच्या दौऱ्यावर होते. त्या दौऱ्यात पाटील यांनी बावनकुळे यांची भेट घेऊन सुमारे तासभर चर्चा केली.

त्यानंतर पत्रकारांनी त्यांना काय चर्चा झाली, अशी विचारणा केल्यावर पाटील यांनी हो... हो त्याचीच चर्चा आज झाली. लवकरच तुमच्या मनात आहे ते होईल, असे सांगून अधिक बोलणे टाळले. मात्र, त्यांनी ते भाजपवासी होणार असल्याचेच सूचीत केले. त्याला भाजपचे अतुल भोसले यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे ते लवकरच भाजपवासी होतील, अशी शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jagan Mohan Reddy: मोठी बातमी! जगनमोहन रेड्डींच्या पक्षाने 'NDA'च्या सीपी राधाकृष्णन यांना जाहीर केला पाठिंबा

Uttar Pradesh : योगी आदित्यनाथ यांनी गोरखपूरमध्ये केले देशातील दुसऱ्या हरित हायड्रोजन प्रकल्पाचे उद्घाटन

ब्रेकिंग! 18 दिवसांत अतिवृष्टीने राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील 3.73 लाख हेक्टरवरील पिके भुईसपाट; कृषी विभागाचा नजर अंदाज अहवाल; पंचनामे करण्यास ई-पीक पाहणीची अडचण

MP Nilesh Lanke : श्रीरामपूर-परळी ब्रॉडगेज प्रकल्प पुन्हा सुरू करा; नीलेश लंके यांची रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

6,6,6,6,6,6! भारतीय गोलंदाजाची T20 मध्ये १९ चेंडूंत फिफ्टी, आठव्या क्रमांकावर आला धुमाकूळ घातला, नंतर ३ विकेट्सही टिपल्या

SCROLL FOR NEXT