Flamingo Birds esakal
सातारा

Manganga River : 143 वर्षांपूर्वी ब्रिटिश राणी व्हिक्टोरियांनी बांधलेल्या तलावात तब्बल 'इतक्या' परदेशी फ्लेमिंगोंची हजेरी

खटाव तालुक्यातील सूर्याचीवाडी, येरळवाडी व मायणी तलाव फ्लेमिंगोच्या प्रतीक्षेत आहेत.

अंकुश चव्हाण

देवापूर (ता. माण) हा तलाव भौगोलिक दृष्ट्या सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर ब्रिटिश राणी व्हिक्टोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली माणगंगा नदीवर बांधला आहे.

कलेढोण : ब्रिटिश राणी व्हिक्टोरिया (British Queen Victoria) यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १४३ वर्षांपूर्वी माणगंगा नदीवर (Manganga River) बांधलेला तलावात परदेशी ४५ फ्लेमिंगोंनी (रोहित, अग्निपंख) हजेरी लावण्याचा पहिला मान ‘माण’ तालुक्यातील देवापूर तलावाला दिला आहे.

खटाव तालुक्यातील सूर्याचीवाडी, येरळवाडी व मायणी तलाव फ्लेमिंगोच्या प्रतीक्षेत आहेत. खटाव- माणमधील नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये थंडीच्या दिवसात छोट्या- मोठ्या पाणवठ्यावर पाणथळी पक्षी हजेरी लावतात. माण तालुक्यातील पिंगळी व देवापूर तलावात फ्लेमिंगो पक्षांनी अनेक वेळा हजेरी लावली आहे, तर खटाव तालुक्यातील मायणी, येरळवाडी व सूर्याचीवाडी या तलावात परदेशी पाहुणे पक्षी कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावतात.

देवापूर (ता. माण) हा तलाव भौगोलिक दृष्ट्या सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर ब्रिटिश राणी व्हिक्टोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली माणगंगा नदीवर बांधला आहे. सध्या माणची दुष्काळी परिस्थिती असल्याने तलावात पुरेसा पाणीसाठा नाही. मात्र, फ्लेमिंगोसाठी (Flamingo Bird) हा तलाव उदरनिर्वाहासाठी फायद्याचा ठरत आहे.

लांब गुलाबी पाय, केळीसारखी गुलाबी- काळी चोच, इंग्रजीतील एस आकारासारखी मान असे दिसणारे फ्लेमिंगो दलदलीच्या भागातील मासे, शैवाल व छोटे किटक शोधताना देवापूर तलावात दिसत आहेत. पेरू, चिली, मंगोलिया, बोलिव्हिया आणि अर्जेंटिनाच्या उच्च अँडीज रांगांत तर भारतात कच्छच्या रणात फ्लेमिंगो आढळतात. येथे पडणाऱ्या थंडीपासून संरक्षणासाठी हे पक्षी दुष्काळी तालुक्यात कमी थंडीच्या प्रदेशात हजेरी लावतात.

त्यांचे निरीक्षण करण्यासाठी सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आदी ठिकाणासह स्थानिक भागातून पक्षीमित्र तलावावर दाखल होतात. दुपारच्या उन्हाला पाठीवरच्या पंखात मान खुपसून बसणारे फ्लेमिंगोंना पाहणे, कॅमेराबंद करणे हे पक्षी मित्रांसाठी परवनीच असते. सध्या देवापूर तलावात नावाच्या टेकडीजवळ हे पक्षी वास्तव्यास असून, सकाळी ते तलावाकडील भागात दिसून येत असल्याचे स्थानिक रहिवासी युवराज जाधव यांनी सांगितले. तलावातील पाण्याची पातळी खालावल्याने सुरक्षिततेसाठी हे पक्षी तलावातील मध्यवर्ती ठिकाणच्या टेकडीवर दिसून येत आहेत.

कसे व कोठून जाल?

  • सातारा- म्हसवड ८७ किलोमीटर - म्हसवडच्या दक्षिणेकडे ११ किलोमीटर

  • कऱ्हाड- मायणी- म्हसवड ८५ किलोमीटर- म्हसवडच्या दक्षिणेकडे ११ किलोमीटर

  • मायणी- म्हसवड ४३ किलोमीटर - म्हसवडच्या दक्षिणेकडे ११ किलोमीटर

कोठून होते आगमन?

  • स्थानिक स्थलांतरित पक्षी : गुजरात कच्छचे रणातून

  • परदेशी स्थलांतरित पक्षी : पेरू, चिली, मंगोलिया, बोलिव्हिया आणि अर्जेंटिनाच्या उच्च अँडीज रांगा

ब्रिटिश राणी व्हिक्टोरिया यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे १४० वर्षांपूर्वी माणगंगा नदीवर सांगली जिल्ह्यातील राजेवाडी (ता. आटपाडी) येथे या तलावाची निर्मिती केली होती. तलावाची भिंत व दारे राजेवाडी (जि. सांगली) हद्दीत आहे, तर पाणीसाठा माण (जि. सातारा) हद्दीत होतो.

-संजीव यादव, पळसावडे (ता. आटपाडी)

यंदा तलावात मुबलक पाणीसाठा नाही. दलदलीच्या भागात हे फ्लेमिंगो पक्षी गेल्या आठ दिवसांपासून दिसत आहेत.

-पोपटराव बुधावले, देवापूर, ता. माण

कसा दिसतो?

  • उंची : सुमारे चार ते पाच फूट लांब (१२५ सेमी)

  • मान : इंग्रजीतील ‘एस’ आकारासारखी वळणदार, उन्हात पाठीवरच्या पंखात खुपसून बसतात

  • पाय : काड्यासारखे गुलाबी

  • पंख : वरून पांढरे आतून गुलाबी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT