Assembly Elections Jaykumar Gore
Assembly Elections Jaykumar Gore esakal
सातारा

Assembly Elections : '..तोपर्यंत मी निवडणूक लढणार नाही, हा माझा शब्दच आहे'; BJP आमदाराची मोठी घोषणा

सकाळ डिजिटल टीम

४४ गावांना टेंभू योजनेचे पाणी देण्याचा शब्‍द उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी २०१८ मध्‍ये दिला होता.

बिजवडी : माण-खटावमधील ४४ गावांसाठी टेंभू प्रकल्पांतर्गत (Tembu Water Project) अडीच टीएमसी, तर माणच्या उत्तरेकडील २१ गावांसाठी जिहे- कठापूरचे दीड टीएमसी पाणी फेरवाटपामुळे आरक्षित झाले. त्यासाठी निधीही मंजूर झाला. जिहे- कठापूर योजनेचे भूमिपूजन करून पाइपलाइनचे काम सुरू आहे, तर नुकतेच ४४ गावांच्या सिंचनासाठी ६८४ कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे. एका महिन्यात टेंडर निघून या योजनेचे लवकरच भूमिपूजन होईल अन्‌ जोपर्यंत जिहे- कठापूरचे पाणी हिंगणीत सुटत नाही, टेंभूच्या योजनेचे भूमिपूजन करत नाही तोपर्यंत आपण निवडणूक लढणार नाही हा माझा शब्दच आहे, असे प्रतिपादन आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांनी केले.

दहिवडी (ता. माण) येथे खटाव-माण तालुक्‍यांतील जनतेच्‍या वतीने वाजतगाजत, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि फुलांचा वर्षाव करत आमदार गोरे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्‍या वेळी ते बोलत होते.

या वेळी माजी आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, अरुण गोरे, धनाजी जाधव, अर्जुन काळे, सिद्धार्थ गुंडगे, गणेश सत्रे, शिवाजीराव शिंदे, खटावचे तालुकाध्यक्ष धनंजय चव्हाण, अतुल जाधव, सोमनाथ भोसले, हरिभाऊ जगदाळे, रामभाऊ देवकर, माजी सभापती रघुनाथ घाडगे, विशाल बागल, शरद पाटील, अभिजित देशमुख, सत्यजित साळुंखे, सरपंच प्रीती शेटे, अनिल घाडगे, सुरेश देशमुख, प्रशांत बागल, किशोर बागल, शिवाजी दुबळे, अमोल साबळे आदी मान्यवर, कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार गोरे म्हणाले, ‘‘टेंभूचे पाणी सातारा जिल्ह्याचे आहे अन्‌ आमचं भागल्याशिवाय ते पाणी आम्ही दुसऱ्यांना नेऊ देणार नाही ही भूमिका घेतल्याने आज टेंभूचे पाणी मिळाले आहे. यामध्‍ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खंबीर साथ मिळाली. ४४ गावांना टेंभू योजनेचे पाणी देण्याचा शब्‍द उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी २०१८ मध्‍ये दिला होता. त्याचा पाठपुरावा आपण कायम करत होतो. मात्र, कृष्णा खोऱ्याचे पाणी लवादानुसार वाटप झाले असल्‍याने या भागाला पाणी आणणे खूप अवघड होते.

मात्र, या भागाला पाणी उपलब्ध करून देण्यासाठी फेरजलनियोजन करण्‍याची संकल्पना आपण श्री. फडणवीस यांच्याकडे मांडली. त्यांनीही याबाबत सकारात्मक भूमिका घेत फेरवाटपावर शिक्‍कामोर्तब केले. त्यामुळेच आज या योजना मार्गी लागल्या आहेत.’’ डॉ. येळगावकर यांनीही त्यांच्या कार्यकाळात पाण्यासाठी संघर्ष केला. या योजनांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहात निधी दिल्याबद्दल मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व सरकारचे आपण आभारी आहोत, असेही त्यांनी सांगितले. या वेळी डॉ. येळगावकर, धनंजय चव्हाण, रघुनाथ घाडगे यांनीही मनोगते व्यक्त केली. शिवाजीराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले. सोमनाथ भोसले यांनी आभार मानले.

आमदार गोरे उवाच...

  • औंधची १६ गावे माझ्‍याच मतदारसंघाचा भाग आहेत. त्‍यात दुजाभाव होणार नाही. त्याही गावांना पाणी देणारच.

  • जिहे- कठापूरच्या पाण्याचे पूजन करण्यासाठी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तारीख कधी मिळतेय त्याची वाट पाहतोय.

  • किरकसाल येथे तेरा वर्षांपूर्वी आपण जिहे- कठापूरचे पाणी आणल्याशिवाय फेटा बांधणार नाही हा पण केला होता. आता जिहे- कठापूरच्या पाण्याचे पूजन करूनच फेटा बांधणार.

  • आम्ही मराठा समाजाबरोबर आहे. त्यांना आरक्षण मिळाल पाहिजे ही आमची प्रामाणिक भूमिका आहे; पण यातही काही लोक राजकारण करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Kalyani Nagar Accident :भ्रष्ट चेल्यांनी बदलले तिघांचे रक्तनमुने ; ‘ससून’मधील डॉक्टरांची बनवाबनवी

Pune Accident : पुण्यात पुन्हा रॅश ड्रायव्हिंग ; बीआरटी मार्गात घुसवली मोटार

World No Tobacco Day 2024 : हृदय-फुफ्फुसांपासून ते कर्करोगापर्यंत, धूम्रपानामुळे ‘या’ गंभीर आजारांना मिळतेय आमंत्रण

World No Tobacco Day 2024: ‘तंबाखू’वर मात शक्य! हवा फक्त दृढनिश्चय; ‘आरोग्य’ विभागाकडून 2 वर्षात दीड लाखावर समुपदेशन

SCROLL FOR NEXT