Satyajit Singh Patankar vs Shambhuraj Desai esakal
सातारा

आघाडीतच रंगणार झेडपीचं धुमशान; देसाई-पाटणकर गटांत होणार लढती

जालिंदर सत्रे

दोन्ही नेते पुन्हा सक्रिय झाल्याने राजकीय धुरळा उडणार आहे.

पाटण (सातारा) : जिल्हा बँक निवडणूकीपासून (District Bank Election) राजकीय शांतता असलेल्या पाटण तालुक्यात (Patan Taluka) आगामी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीची (Panchayat Samiti Election) मशागत सुरू झाली आहे. आघाडी शासनाच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांमध्येच जिल्हा परिषद, पंचायत समितीचा सामना रंगणार आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजनाचा सपाटा लावला आहे. विरोधी सत्यजितसिंह पाटणकर धरणांची अपूर्ण कामे, अतिवृष्टीतील नुकसान भरपाईच्या निमित्ताने ॲक्शन मोडवर आले आहेत.

राज्य सरकारने ओबीसी आरक्षण (OBC Reservation) लटकल्याने जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत. पाटण पंचायत समितीच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल संपल्यानंतर शासनाने प्रशासकाच्या हाती कारभार दिला आहे. गटविकास अधिकारी मीना साळुंखे सध्या प्रशासक म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. पावसाळ्यापूर्वी निवडणुका जाहीर झाल्या, तर प्रचाराला वेळ मिळणार नाही, हे लक्षात घेऊन दोन्ही नेते सक्रिय झाले आहेत. दोन महिने झाले गृहराज्यमंत्री देसाई यांनी विकासकामांचे उद्घाटन, भूमिपूजन कार्यक्रमांचा सपाटा लावला आहे. सायरन वाजवत गृहराज्यमंत्र्यांची लाल दिव्याची गाडी प्रत्येक विभागातील गावागावांत सुसाट धावत आहे. कार्यकर्ते मंत्री देसाईंच्या मिरवणुका काढून वातावरणनिर्मिती करत आहेत.

जिल्हा बँक व नगरपंचायत निवडणुकीनंतर पाटणकर यांनी आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांना बरोबर घेऊन शिष्टमंडळासह धरणांच्या अपूर्ण कामासंदर्भात व अतिवृष्टी नुकसानभरपाई निधीच्या निमित्ताने मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासोबत बैठका घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची गाडी ॲक्शन मोडवर आणत आहेत, असे दिसत आहे. जिल्हा बँक व नगरपंचायत निवडणुकीत राजकीय आरोप-प्रत्यारोप टोकाचे झाले. काही काळ शांतता होती. मात्र, पुन्हा दोन्ही नेते सक्रिय झाल्याने राजकीय धुरळा उडणार आहे. आघाडीचा धर्म पाळत विरोधक आक्रमक नसले तरी गृहराज्यमंत्री देसाई यांनी सुसाट वेगाने चाललेल्या गाडीवर नियंत्रण न ठेवल्यास अपघाताला निमंत्रण दिल्यासारखे होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT