Dahiwadi Nagar Panchayat Election esakal
सातारा

राष्ट्रवादीचा मार्ग मोकळा; 'नगराध्यक्ष' शर्यतीतून भाजप, सेनेची माघार

रुपेश कदम

अपक्षाच्या मदतीनं राष्ट्रवादीला काठावरचे बहुमत मिळाले आहे.

दहिवडी (सातारा) : दहिवडी नगरपंचायतीच्या (Dahiwadi Nagar Panchayat) नगराध्यक्षपदाच्या निवडीत नाट्यमय घडामोडी घडत आज भाजप (BJP) व शिवसेनेच्या (Shiv Sena) उमेदवारांनी माघार घेतल्याने उद्या राष्ट्रवादीच्या (NCP) सागर पोळ यांच्या नगराध्यक्षपदी निवडीची फक्त औपचारिकता उरली आहे.

नगरपंचायत निवडणूक सुरुवातीपासून गाजली. त्यात अपक्षाच्या मदतीने राष्ट्रवादीला काठावरचे बहुमत मिळाले. राष्ट्रवादीच्या महेश जाधव यांच्या बंडाने वातावरण ढवळले. नंतर त्यांनी माघार घेतल्याने हे बंड शमले. त्यानंतर भाजपचे धनाजी जाधव व शिवसेनेच्या सुरेखा पखाले यांच्यापैकी कोण माघार घेणार, की दोन्ही अर्ज राहणार, की कोण कोणाला साथ देणार, याबद्दल चर्चा घडू लागल्या.

चमत्कार घडेल अशी अपेक्षा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना होती. मात्र, प्रयत्न करूनही विजयाचे गणित जुळत नाही, हे लक्षात येताच आज धनाजी जाधव व सुरेखा पखाले यांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे राष्ट्रवादीचे सागर पोळ यांचा एकमेव उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने उद्या त्यांच्या बिनविरोध निवडीची फक्त औपचारिकता राहिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Court Restrooms: हे वापरकर्त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन; कोर्टातील अस्वच्छ स्वच्छतागृहांबाबत स्थिती अहवाल सादर

PAK vs SA Test: पाकड्यांचे घरच्या मैदानावर वस्त्रहरण; दक्षिण आफ्रिकेने दाखवली जागा; WTC मध्ये दिला शेजाऱ्यांना धक्का

Crime News : पतीचे सावत्र आईसोबत प्रेमसंबंध, विरोध करणाऱ्या पत्नीची गोळ्या घालून हत्या; १० वर्षांच्या मुलाने सांगितली हकीकत

तेजस्वी यादव महाआघाडीचे CM पदाचे उमेदवार, आता NDAने सांगावं, नाहीतर महाराष्ट्रासारखं कराल; भाजपवर टीका

Premachi Goshta 2 Review: मैत्री, प्रेम आणि भावनिक नात्याचा सर्वांगसुंदर कलाविष्कार, कसा आहे ललितचा 'प्रेमाची गोष्ट २' सिनेमा?

SCROLL FOR NEXT