Devendra Fadnavis-Chandrakant Patil esakal
सातारा

आगामी सर्व निवडणुका भा‍जप स्‍वबळावर लढणार; कोअर कमिटीची लवकरच घोषणा

गिरीश चव्हाण

कुणीही यावं आणि टपली मारून जावं, इतका भाजप लहान राहिला नाही.

सातारा : सातारा पालिकेसह (Satara Municipality) सर्वच ठिकाणच्‍या निवडणुका भारतीय जनता पक्ष (Bharatiya Janata Party) स्‍वबळावर चिन्‍हावर लढणार असून, त्‍यासाठीची कोअर कमिटी (BJP Core Committee) लवकरच तयार करण्‍यात येणार असल्‍याची माहिती भाजपचे शहराध्‍यक्ष विकास गोसावी (Vikas Gosavi) यांनी पत्रकाव्‍दारे दिली. याच पत्रकात त्‍यांनी भाजप कुणासाठी आणि कुणालाही पर्याय नसल्‍याचे स्‍पष्‍ट करत धोका होण्‍याची शक्‍यता असलेल्‍या ठिकाणी पक्षाने स्‍वतंत्र यंत्रणा उभारल्‍याचेही नमूद केले आहे.

सातारा पालिकेसह इतर सर्वच ठिकाणच्‍या निवडणुकांच्‍या अनुषंगाने श्री. गोसावी यांनी भूमिका पत्रकात मांडली आहे. पत्रकात म्‍हटले आहे की, कुणीही यावे आणि टपली मारून जावे, इतका भाजप लहान राहिला नसून तो स्‍वत:च्‍या ताकदीवर सत्ता खेचून आणू शकतो. साताऱ्यातील पक्षाचे संघटन मजबूत असून, त्‍यातील कोणीही इतके-तिकडे गेले नाही अथवा जाणार नाही. काही कारणांनी पदे दिलेल्‍या दुतोंडी कार्यकर्त्यांवर संघटनेची कोणतीही जबाबदारी देण्‍यात आलेली नाही. आगामी काळात अशा का‍र्यकर्त्यांकडून होणारा धोका टाळण्‍यासाठी त्‍याठिकाणी पक्षाने स्‍वतंत्र यंत्रणा तयार ठेवली आहे.

सातारा पालिकेच्‍या गत निवडणुकीत पक्षाने ३१ उमेदवार रिंगणात उतरवत सहा जणांना निवडून आणले होते. त्‍यानंतर विविध उपक्रमांच्‍या माध्‍यमातून पक्षाने सातारकरांना आपलेसे केले असून, त्‍याबाबत नेहमीच माजी मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रदेशाध्‍यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे. येत्‍या निवडणुकीत प्रत्‍येक प्रभागात भाजपकडे उमेदवार उपलब्‍ध असून, त्‍यासाठीचा सर्व अभ्‍यास, आराखडा करण्‍याचे काम सध्‍या सुरू आहे. पक्षाचे वरिष्‍ठ तसेच जिल्‍हाध्‍यक्ष विक्रम पावसकर (Vikram Pawaskar) यांच्‍या नेतृत्त्‍वाखाली सर्व पालिका निवडणुका भाजपच्‍या चिन्‍हावर लढणार आहे. यासाठीच्‍या कोअर कमिटीची घोषणाही लवकरच होईल तसेच आगामी नगराध्‍यक्षा भाजपचाच असेल, असा विश्‍‍वासही श्री. गोसावी यांनी पत्रकात व्‍यक्‍त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT