Dhebewadi Police Crime News esakal
सातारा

Satara Crime : उंदीर, घुशी मारण्याच्या औषधाची ट्यूब पोलिसांना सापडली; चौघांच्या मृत्यूचे फॉरेन्सिक लॅबच उकलणार गूढ

सणबूर (ता. पाटण) येथील एका घरात काल मृतावस्थेत आढळलेल्या चौघांच्या मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

सकाळ डिजिटल टीम

चारही मृतदेहाच्या अंगावर झटापटीच्या किंवा संशयास्पद खुणा आढळलेल्या नाहीत. दरवाजाही आतूनच बंद केलेला होता.

ढेबेवाडी : सणबूर (ता. पाटण) येथील एका घरात काल मृतावस्थेत आढळलेल्या चौघांच्या मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. जनरेटरच्या धुरामुळे गुदमरून किंवा विषबाधा यापैकी एक कारण असावे, असा तपास यंत्रणेचा अंदाज आहे.

या घटनेतील मृत दांपत्य व त्यांच्या मुलावर सणबूर येथे, तर विवाहित मुलीवर सासरी मंद्रुळकोळे (ता. पाटण) येथे काल रात्री उशिरा शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सणबूर येथील निवृत्त माध्यमिक शिक्षकाचे आख्खे कुटुंबच या घटनेत मृत्युमुखी पडले असून, जाधव सरांचे बंद घर बघून समाजमन हळहळत आहे.

सणबूरचे निवृत्त माध्यमिक शिक्षक आनंदा पांडुरंग जाधव (वय ७५) यांच्या घरात त्यांच्यासह पत्नी सुनंदा (वय ६५), मुलगा संतोष (वय ४५)आणि विवाहित मुलगी पुष्पलता प्रकाश धस (वय ५२ रा. मंद्रुळकोळे, ता. पाटण) अशा चौघांचे मृतदेह काल सकाळी झोपलेल्या जागी अंथरुणावरच आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली.

आनंदा जाधव काही दिवसांपासून आजारी असल्याने कऱ्हाड येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र, त्यांच्या तब्येतीत सुधारणा नसल्याने गुरुवारी सायंकाळी त्यांना सणबूर येथे घरी आणण्यात आले. श्वसनास त्रास होत असल्याने पोर्टेबल ऑक्सिजन मशिन आणि वीजपुरवठा खंडित होत असल्याने जनरेटरही आणण्यात आला होता. उत्तरीय तपासणीमध्ये चौघांच्याही मृत्यूचे नेमके कारण समोर आलेले नाही.

चौघांच्या पोटात गेलेले अन्नपाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, त्याच्या अहवालानंतरच मृत्यूच्या नेमक्या कारणावर प्रकाश पडेल. घटनास्थळी घरात पोलिसांना उंदीर व घुशी मारण्याच्या औषधाची ट्यूब सापडली आहे. त्या रात्री घरात असलेले जेवणातील भात, चपाती, आमटी, दूध आदी पदार्थाचे नमुनेही तपासणीस घेण्यात आले आहेत.

सणबूर येथील निवृत्त माध्यमिक शिक्षकाचे आख्खे कुटुंबच या घटनेत मृत्युमुखी पडले असून, आज त्यांच्या बंद घराकडे बघून प्रत्येक जण हळहळत होता. चारही मृतदेहाच्या अंगावर झटापटीच्या किंवा संशयास्पद खुणा आढळलेल्या नाहीत.

दरवाजाही आतूनच बंद केलेला होता. घराला वरील बाजूस एकमेव छोटीशी खिडकी आहे. बंद घरात लावलेल्या जनरेटरचा धूर किंवा विषबाधा ही दोनच कारणे यामागे असावीत, असा पोलिसांचा अंदाज आहे. सहायक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

Crime: पक्षातील सदस्याला अडकवण्यासाठी घरात स्फोटके आणि दारू ठेवली, पण काँग्रेस नेता स्वत:च अडकला अन्...; काय घडलं?

SCROLL FOR NEXT