Kaloshi Village esakal
सातारा

बालपणीच्या आठवणींना साद! माजी सैनिकानं रंगरेषांतून साकारला 'आठवणीतला गाव'

सुनील शेडगे

नागठाणे (सातारा) : आपला गाव (Village), गावची माती हा प्रत्येकाच्याच आत्मीयतेचा विषय. माणूस कितीही मोठा झाला अन् कुठेही गेला तरी आपल्या गावाला कधीच विसरू शकत नाही. गावची वेस, तिथला पार, पाणवठा, वाडे, मंदिरे (Temple), बालपणाचे दिवस कायम त्याला साद घालतात. हाच आठवणीतील गाव एका माजी सैनिकाने (Ex-servicemen) चित्रांच्या रूपाने जिवंत केला आहे. (Ex-servicemen Ramesh Daphal Painted A Beautiful Picture Of Kaloshi Village Satara Marathi News)

आपला गाव (Village), गावची माती हा प्रत्येकाच्याच आत्मीयतेचा विषय. माणूस कितीही मोठा झाला अन् कुठेही गेला तरी आपल्या गावाला कधीच विसरू शकत नाही.

रमेश गणपत डफळ (Ramesh Daphal) हे त्यांचे नाव. सातारा तालुक्यातील उरमोडी धरणालगत (Urmodi Dam) असलेले काळोशी हे त्यांचे गाव. परळीतील विद्यालयात शिकत असल्यापासून ते उत्तम चित्रे काढत. मात्र, परिस्थितीमुळे त्यांना चित्रकलेचे शिक्षण घेता आले नाही. मग ते लष्करी सेवेत भरती झाले. पुढे निवृत्तीनंतर रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank) सुरक्षा विभागात दाखल झाले. सध्या ते फोर्ट येथील शाखेत कार्यरत आहेत. लॉकडाउन (coronavirus lockdown) काळात इच्छा असूनही त्यांना गावी येता येत नव्हते. गावच्या, बालपणीच्या आठवणी (Childhood memories) त्यांना साद घालत होत्या. मग याच आठवणी त्यांनी रंगरेषांच्या साह्याने कागदावर चितारल्या. त्यातून कितीतरी मनोवेधक पोट्रेट आकाराला आली आहेत.

वाघजाई, काळंबादेवी अन् मारुतीचे मंदिर (Maruti Temple), गावचा पार, माडीची कौलारू घरे, जुने वाडे, वेशीतला वड, गावाकडील पूल, लगतचा डोंगर अशा आठवणी त्या रूपाने जिवंत झाल्या आहेत. कलेचे कोणतेही शिक्षण नसताना केवळ निरीक्षण, अभ्यास, मेहनत अन् चिकाटी यातून हा प्रवास यशस्वी झाल्याचे श्री. डफळ सांगतात. या कामी विद्यालयात असताना शिकविणारे दीक्षित सर, मधुकर निकम, बंधू बबन डफळ, साताऱ्यातील गजानन पेंटर, चंद्रकांत घोडके यांचे प्रोत्साहन मोलाचे ठरल्याचे ते सांगतात.

Beautiful Picture

लाख मोलाची भेट

नगर येथे असताना आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिल्पकार प्रमोद कांबळे यांचे मार्गदर्शन श्री. डफळ यांना लाभले. त्यांच्याकडून मिळालेली चित्रकलेच्या दुर्मिळ पुस्तकांची भेट हा आपल्या आयुष्यातील सर्वांत संस्मरणीय भेट असल्याचे ते सांगतात. त्यामुळे चित्रे काढण्यासाठी नवीन ऊर्जा लाभल्याचे त्यांनी नमूद केले.

Ex-servicemen Ramesh Daphal Painted A Beautiful Picture Of Kaloshi Village Satara Marathi News

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर,काठच्या गावांना सतर्केतेचा इशारा

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT