Grass
Grass esakal
सातारा

भारीच! दुष्काळी माणदेशात गवतापासून गॅसनिर्मिती; युवकांना मिळणार रोजगार

विशाल गुंजवटे

बिजवडी (सातारा) : दुष्काळी माणदेशात "हत्ती' या गवतापासून (Grass) थेट गॅसनिर्मितीचा (Gas Project) महत्त्वपूर्ण प्रकल्प मासाळवाडी (म्हसवड) (ता. माण) येथे उभारला जातोय. या प्रकल्पातून दररोज 100 टन गॅसची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना (Farmer) हमखास उत्पन्न, तर युवकांना रोजगारही मिळणार आहे. (Gas Project To Be Set Up From Grass At Masalwadi Mandesh Satara Marathi News)

दुष्काळी माणदेशात 'हत्ती' गवतापासून थेट गॅसनिर्मितीचा महत्त्वपूर्ण प्रकल्प मासाळवाडी (म्हसवड) येथे उभारला जातोय.

मुंबईच्या मीरा क्‍लिन फ्युएल्स (एमसीएल) संचलित प्रभुरत्न बायोफ्युल्स इंडिया प्रा. लि., प्रभुरत्न प्रोड्युसर कंपनीतर्फे या प्रकल्पाची उभारणी करण्यात येत आहे. मासाळवाडी येथे संस्थेचे अध्यक्ष दीपक कोळपे (Deepak Kolpe) यांच्या हस्ते या प्रकल्पाचे नुकतेच उद्‌घाटन झाले. "हत्ती' गवतापासून बायो सीएनजी (Bio CNG) (गॅसनिर्मिती) करणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणून शेतकऱ्यांकडून साधारणत: प्रतिटन एक हजार रुपये दराने "हत्ती' गवत खरेदी केले जाणार आहे. त्यापासून प्रतिदिन 100 टन गॅसनिर्मिती होणार आहे. सध्या सर्वत्र पेट्रोल, डिझेल (Petrol Diesel) आणि घरगुती गॅसचे भाव सामान्यांच्या आवाक्‍याच्या बाहेर गेले आहेत. अशातच आता सामान्यांना परवडेल असे स्वस्त दरातील जैवइंधन येथे निर्मित होणार आहे.

सध्या बाजारात उपलब्ध असणारा सीएनजीमधून अल्प प्रदूषण होते. परंतु, येथे 100 टक्के आंतरराष्ट्रीय गुणवत्तेच्या इंधनाची निर्मिती होणार आहे. या इंधन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल शेतातच निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांना शाश्वत व चांगले उत्पन्न मिळणार आहे. या प्रकल्पामुळे तालुक्‍यातील युवकांना रोजगार उपलब्ध होणार आहेत. शेतकऱ्यांना "हत्ती' गवताचे नवीन विकसित वाण 'सुपर नेपियर'चे बियाणे कंपनीमार्फत पुरावण्यात येणार आहे. या पिकाला जमीन कोणत्याही प्रकारची चालते. शिवाय फारसे कष्ट घ्यावे लागत नाही. त्यातून अडीच महिन्यांत साधारणतः एकरी 40 टन गवताचे उत्पन्न मिळते. साधारणतः वार्षिक 150 टन उत्पादन धरले तरी शेतकऱ्यास दीड लाखाचे उत्पन्न हमखास मिळू शकते. या प्रकल्पामुळे दुष्काळी माणच्या वैभवात भर पडणार आहे.

भारताला 82 टक्के इंधन आयात करावे लागते. त्यामुळे भारताचा बराचसा पैसा इंधनासाठी बाहेरच्या देशांना जातो. त्याला पर्याय म्हणून हा प्रकल्प आत्मनिर्भर ठरेल. हा प्रकल्प प्रदूषणमुक्त व कॅन्सरमुक्त शेतीकडे नेणारा आहे.

-दीपक कोळपे, अध्यक्ष, प्रभुरत्न बायोफ्युल्स इंडिया प्रा. लि.

ग्रामीण भागात असा प्रकल्प होणे ही अतिशय अभिमानाची बाब आहे. आजची इंधनाची गरज लक्षात घेता पर्यायी इंधन म्हणून हा स्वच्छ जैवइंधनाचा पर्याय आवश्‍यकच आहे. त्यासाठी लागणारा कच्चा माल शेतातच तयार होत असल्याने येथील शेतकरी आर्थिक समृद्ध बनेल.

-भावेश गुळीक, ग्राम उद्योजक, वावरहिरे (ता. माण)

Gas Project To Be Set Up From Grass At Masalwadi Mandesh Satara Marathi News

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha election 2024 Results : भारतातल्या लोकसभा निकालावर चीनची प्रतिक्रिया; ''जर मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर...''

Bollywood Actor: माधुरीचा ड्रायव्हर म्हणून केलं काम, पहिल्याच चित्रपटात रेखासोबत इंटिमेट सीन, पण फ्लॉप अभिनेत्याचा लागला टॅग, पण आता...

Lucknow Robbery : चोरी करायला गेला अन्..एसीत झोपला ; लखनऊच्या चोराचा पराक्रम पाहिलात काय?

Crime News: मुंबईच्या IAS आधिकाऱ्याच्या मुलीने उचललं टोकाचं पाऊल; कारण अस्पष्ट

Iran: इराणमध्ये अध्यक्षपदासाठी महिला उमेदवार रिंगणात, पण निवडणुकीआधीच होणार पराभव? कारण काय?

SCROLL FOR NEXT