Shashikant Shinde vs Mahesh Shinde esakal
सातारा

'शशिकांत शिंदे भाजपात प्रवेश करत असतील, तर त्यांचं मी घट्ट मिठीत घेऊन स्वागत करेन'

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकरही भाजपच्या वाटेवर?

सकाळ डिजिटल टीम

विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकरही भाजपच्या वाटेवर?

कोरेगाव (सातारा) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते (NCP) आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) हे भारतीय जनता पक्षामध्ये (BJP) प्रवेश करत असतील, तर त्यांचे मी घट्ट मिठीत घेऊन स्वागत करेन. कारण, त्यातून मी असा अर्थबोध घेईन की त्यांना त्यांचे नेते चुकीचे होते याची उपरती झाली असेल, असे मत आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी आज पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

येथे विविध विकासकामांचे उद्‍घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रम आयोजिला होता. त्यावेळी महेश शिंदे यांना पत्रकारांनी शशिकांत शिंदे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत काय? चर्चा आहे? असा प्रश्न विचारला असता त्यावर महेश शिंदे म्हणाले, ‘‘मला आनंद होईल; पण खर तर हा प्रश्न भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या अखत्यारीमधील आहे. तसे म्हटले तर आज अनेक जण पक्ष प्रवेशासाठी रांगेमध्ये आहेत; पण तो निर्णय वरिष्ठ पातळीवर होऊ शकतो. आज खळ उठले आहे, वस्ती उठायला वेळ नाही लागणार.’’ विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक- निंबाळकरही (Ramraje Naik- Nimbalkar) भाजपच्या वाटेवर असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता त्यांनी पुन्हा हा प्रश्न भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या अखत्यारीतील असल्याचे स्पष्ट केले. राज्य मंत्रिमंडळात आपला समावेश होऊ शकेल का? असे विचारता महेश शिंदे म्हणाले, ‘‘आमचे नेते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा पूर्णतः विश्वास असल्यामुळे मला संधी मिळेल असा विश्वास वाटतो. पाहू या. काय होते.’’

जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना आपण सहा महिन्यांत सभासदांच्या ताब्यात घेऊ, असे आपण विधान केले असून, त्याला आधार काय? असे पत्रकारांनी विचारले असता श्री. शिंदे म्हणाले, ‘‘मी जरंडेश्वर सहकारी साखर कारखाना (Jarandeshwar Sugar Factory) हा सहा महिन्यांत नव्हे, तर साडेतीन महिन्यांत सभासदांच्या ताब्यात घेऊ, असे म्हटले आहे. असे जे मी बोललो आहे ते मी माझ्या ज्येष्ठ नेत्यांनी दिलेल्या विश्वासावर बोलतो आहे.’’ जरंडेश्वर कारखाना असेल किंवा रयत शिक्षण संस्था असेल या संस्था जिल्ह्याच्या आहेत. त्या ताब्यात असाव्यात, अशी जनतेची इच्छा असल्यामुळे आणि त्याला वरिष्ठ नेत्यांचे पाठबळ असल्यामुळे मी त्याचा पाठपुरावा नेत्यांकडे करत आलो आहे. त्यामुळे हे नक्की घडेल असा मला विश्वास आहे. कोरेगावची औद्योगिक वसाहत, विविध विकासकामे आदी विषयांवर त्यांनी आपली परखड मते व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fadnavis: मुख्यमंत्र्यांसमोर शस्त्र ठेवून माओवादी नेता भूपती शरण येणार? ६० सहकाऱ्यांसह शरणागती, १० कोटींचं होतं बक्षीस

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

PMC Election : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर; ६ नोव्हेंबरला प्रारूप तर १० डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार

Ajinkya Rahane: 5-6 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या खेळाडूंनी निवड समितीत असावं, नाहीतर...; रहाणेचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT