सातारा

कऱ्हाडातील युवकांना फसविणा-यास उत्तर प्रदेशमध्ये अटक

सचिन शिंदे

कऱ्हाड : शेअर मार्केटमधून कमी दिवसात जादा टक्केवारीने पैसे परत देण्याचे आमिष दाखवून शहरातील युवकांना सुमारे वीस लाखांना गंडा घालणार्‍या एकास पाेलिसांनी अटक केली. संबंधितास उत्तर प्रदेश येथील ग्रेटर नोयडा येथे पकडण्यात आले आहे. त्याच्याकडून तीन मोबाईल व एक लॅपटॉप जप्त केला आहे. हरीदयाळ रंजनदास गुप्ता (रा. सॉक्रेटीस 3, ओमीक्रॉन, गे्रटर नोएडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

कऱ्हाड शहरातील युवकांना शेअर मार्केटमधून कमी दिवसात जादा टक्केवारीने पैसे परत देण्याचे आमिष दाखवून फसवणूक झाली होती. त्यात हरीदयाळने ती फसवणीक केली होती असे तपासाअंती उघडकीस आले. कऱ्हाडच्या युवकांकडून 19 लाख 87 हजार 500 रूपये रक्कम वेगवेगळ्या बँक खात्यावर मागवून घेतली होती. ती रक्कम परत न देता ताे पळून गेला होता. त्याबाबत पोलिसात फिर्याद दाखल होती.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिस ठाणेचे सहायक पोलिस निरीक्षक अमित बाबर, हवालदार तानाजी शिंदे, प्रफुल्ल गाडे, मारूती लाटणे, विनोद माने यांनी तपास केला. त्यात दिल्ली व नोएडातून हरीदयाळ यास अटक करण्यात आली.

बंदूक चालविणाऱ्या हाती जेव्हा कुंचला येतो! 

अभिनेते सयाजी शिंदे साताऱ्यात साकारणार पर्यावरणीय उद्यान

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Commuter Murder Mumbai Local : गर्दुल्यांकडून मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! दिवसाढवळ्या घडला धक्कादायक प्रकार

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : ट्रॅविस हेडने डाव सावरला; अर्धशतक ठोकत संघाला नेलं शतकाच्या जवळ

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

SCROLL FOR NEXT