सातारा

'मला घेरण्याचा प्रयत्न करु नका, कारण माझ्या पाठीवर शरद पवारांचा हात'

महेश बारटक्के

मला कोणी घेरण्याचा प्रयत्न करू शकत नाही. कारण माझ्या पाठीशी शरद पवार यांचा आशीर्वाद आहे, असा आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव न घेता कुडाळ येथे एका कार्यक्रमप्रसंगी बोलताना पलटवार केला.

कुडाळ (सातारा): मी निवडणुकीपूरता जावळी तालुक्यात येत नसतो, तर मी इथलाच असतो. या मातीशी माझी नाळ जोडलेली आहे. माझ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे कार्यक्षेत्र आहे. आतापर्यंत जावळीत सर्व काही वातावरण चांगले होते म्हणून फारसे लक्ष देत नव्हतो. मात्र, यापुढे जावळी तालुक्यात यावे लागेल. मला कोणी घेरण्याचा प्रयत्न करू शकत नाही. कारण माझ्या पाठीशी शरद पवार यांचा आशीर्वाद आहे, असा आमदार शशिकांत शिंदे यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे नाव न घेता कुडाळ येथे एका कार्यक्रमप्रसंगी बोलताना पलटवार केला.

येथील पिंपळबन बाल उद्यान लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. सर्जापूर येथे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता निवडणुकीपुरते जावळीत येणाऱ्यांना भुलू नका, असा घणाघात केला होता. त्यालाच प्रतिउत्तर देताना श्री. शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, "शशिकांत शिंदे हा नेहमीच संघर्ष करत आलेला लढवय्या आहे. माझा राजकीय प्रवासाचा उदय जावळीतूनच सुरू झाला असून, राजकारणात सगळेच पत्ते आताच ओपन करायचे नसतात.

वेळ आल्यावर कोणता पत्ता कधी टाकायचा हे मला चांगलेच माहीत आहे. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. निवडणूक होईल किंवा नाही हे ज्या त्या वेळी ठरेल. मात्र, लढणे हे शशिकांत शिंदे यांच्या रक्तात आहे. त्यामुळे लढाई कोणतीही असो मी मागे हटत नाही." काहीही झाले तरी माझी जावळीतून उमेदवारी नक्की असल्याचा ठाम विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. या वेळी खासदार श्रीनिवास पाटील, जावळी पंचायत समितीचे उपसभापती सौरभ शिंदे, माथाडी कामगार नेते ऋषिकांत शिंदे आदी उपस्थित होते.

गेल्या दोन दिवसांत जावळीच्या आजी- माजी आमदारांमध्ये रंगलेल्या कलगी तुऱ्यामुळे जावळीतील राजकीय वातावरण काही प्रमाणात ढवळून निघाले आहे, त्याचे पडसाद दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमधून सोशल मीडियावर आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur News: सुंच आठ वर्षांपासून चालवत होता किडनी विक्रीचे रॅकेट; एका किडनीमागे सव्वा कोटी, मुलीच्या वडिलांनीही दिला होता नकार!

Viral Video : रोहित भाऊ, वडापाव खाणार का? प्रेक्षकांमधून मिळाली आवडत्या पदार्थाची ऑफर; भारी होती हिटमॅनची रिअ‍ॅक्शन

Shukra Gochar 2026: वर्षाच्या पहिल्याच गोचरमध्ये ‘या’ राशींचं नशीब फुलणार, करिअरला मिळणार मोठी उंची

Vijay Hazare Trophy : पहिल्याच दिवशी २२ शतकं, गोलंदाजांची धुलाई; फलंदाजांनी मोडले अनेक विक्रम

पहिल्याच सामन्यात शतक, आता विराट कोहली, रोहित शर्मा यांचा Vijay Hazare Trophy मधील पुढील सामना कधी? वाचा सर्व डिटेल्स

SCROLL FOR NEXT