Pravin Darekar
Pravin Darekar System
सातारा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तुमच्या पाठीशी ठाम : प्रवीण दरेकर

राजेश पाटील

ढेबेवाडी (जि. सातारा) : एखाद्या घटकाविषयी कायदा करताना किंवा निर्णय घेताना शासनाने संबंधित घटकाला विचारात घेण्याबरोबरच समन्वय ठेवण्याची गरज असते. मात्र, आता दुर्दैवाने माथाडींबाबत तसे न घडल्यानेच सध्याच्या बिकट परिस्थितीत माथाडी कामगारांवर उपासमारीची वेळ येण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी आज केला. narendra patil covid 19 pravin darekar satara marathi news

माथाडी कामगार व त्यांच्याशी संलग्न अन्य घटकांचा अत्यावश्‍यक सेवेत समावेश करून त्यांना विमा संरक्षण तसेच रेल्वे व बसने प्रवासाची परवानगी द्यावी, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईतील रेल्वेस्थानकांसमोर माथाडी न्याय हक्क सप्ताह नुकताच सुरू करण्यात आला आहे. श्री.दरेकर यांनी तेथे भेट दिली. माथाडी भवन येथे जावून त्यांनी माथाडी कामगार, व्यापारी, वाहतूकदार कृती समितीशीही संवाद साधला. ते म्हणाले,"" या प्रश्नी मी तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. शासन स्तरावर पाठपुरावा करून तुमच्या मागण्या मार्गी लावू.''

माथाडी नेते नरेंद्र पाटील म्हणाले,""मागण्यांचा शासनाने तत्काळ विचार न केल्यास आम्हाला माथाडी कामगार व व्यापारी यांच्या संयुक्त कृती समितीमार्फत नाईलाजास्तव बेमुदत आंदोलन करावे लागेल.'' नीलेश वोरा, अमृतभाई जैन, भानुशाली, मयूर सोनी, शंकरशेठ पिंगळे, संजय पिंगळे, अशोक जैन, राजेंद्र नवघणे, जितेंद्र येवले, संभाजी बर्गे, श्‍याम धमाले, अनिल सपकाळ, कृष्णा पाटील, अंकलेश यादव, एकनाथ जाधव आदींनी अडचणी मांडल्या. माथाडी संघटनेचे चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, दिलीप खोंड आदी उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

Azamgarh Loksabha Election : ‘सप’च्या बालेकिल्ल्यात दोन यादवांमध्ये लढाई; धर्मेंद्र यादव विरुद्ध दिनेशलाल निरहुआ

Milind Deora : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

SCROLL FOR NEXT