Shambhuraj Desai esakal
सातारा

Gram Panchayat Election Result : साताऱ्यात राष्ट्रवादीचा बालेकिल्ला अभेद्य; शंभूराजे देसाईंना मोठा धक्का

ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल हाती येऊ लागले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

ग्रामपंचायत निवडणुकीत धक्कादायक निकाल हाती येऊ लागले आहेत.

सातारा : राज्यात आज तब्बल 7 हजार 135 ग्रामपंचायतींचा निकाल हाती येणार आहे. रविवारी, या ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं. आता धक्कादायक निकाल हाती येऊ लागले आहेत. साताऱ्यातील कराडमध्ये धक्कादायक निकाल समोर आले आहेत.

शिंदे गटाचे नेते आणि पालकमंत्री शंभूराज देसाईंना (Shambhuraj Desai) पहिला धक्का बसला आहे. सत्ता आली पण सरपंच राष्ट्रवादीचा झाला आहे. तर, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाचा पराभव झाला आहे. सातारा जिल्ह्यातील किवळ ग्रामपंचायतीत सत्तांतर झालं असून राष्ट्रवादी काँग्रेसने १२ पैकी १२ जागांवर विजय मिळवत भाजपा आणि शिंदे गटाला धुळ चारली आहे.

तर, चरेगाव ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता कायम राहिली असून १० जागांवर विजय मिळवला आहे. तर विरोधी गटाला ३ जागांवर समाधान तर सरपंचपदी देवदत्त माने हे निवडुन आले आहेत. तर दुसरीकडं कराड तालुक्यातील पश्चिम सुपने ग्रामपंचायत निकाल पहिला हाती आला आहे. यामध्ये पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि अॅड. उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या गटांनी 4 जागांवर विजय मिळवला आहे. तर विरोधी राष्ट्रवादीला २ जागा मिळाल्या असून सरपंच पदावर राष्ट्रवादी गटानं २ मतानं विजय मिळवला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air India: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! २९ आंतरराष्ट्रीय मार्गांवरील उड्डाणांत मोठी कपात; एअर इंडियाचा मोठा निर्णय, जाणून घ्या यादी...

Fuel Crisis: मोदी बोलले, एकनाथ शिंदेंनी अस्तित्वात आणले, सरकारी ताफ्यातील वाहनं कमी करून दुसऱ्यांसाठी उदाहरण ठरले

MSP hike 2026: मोदी सरकारचा शेतकऱ्यांसाठी मास्टरस्ट्रोक! १४ खरीप पिकांच्या MSP मध्ये वाढ, कापूस-सूर्यफूल उत्पादकांना मोठा फायदा!

IPL 2026 : चेन्नईच्या ताफ्यात दाखल झालेला Macneil Hadley Noronha कोण? UAEत बालपण; DC, KKR, MI साठी दिलेलं ट्रायल...

Mumbai: मुंबईकरांच्या स्वयंपाकघरावर महागाईचा तडाखा! भाजीपाल्याचे भाव वाढले; जाणून घ्या सध्याचे दर...

SCROLL FOR NEXT