Chhatrapati Shivaji Maharaj Hindu Organization esakal
सातारा

Instagram वर छत्रपती शिवरायांबाबत आक्षेपार्ह पोस्ट; साताऱ्यात तणाव, हिंदुत्ववादी संघटनांकडून तोडफोड

छत्रपती शिवाजी महाराजांचा मी भक्त आहे. या आक्षेपार्ह पोस्टशी माझा कुठलाही संबंध नाही - पठाण

सकाळ डिजिटल टीम

दोन समाजात तेढ व तणाव निर्माण करणाऱ्या मास्टर माईंडला शोधून काढून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

सातारा : स्वातंत्र्यदिनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याविषयी इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याच्या निषेधार्थ हिंदुत्ववादी संघटनांच्या नेतृत्वाखाली हजारो युवकांनी काल सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको केला. त्यामुळे दिवसभर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

संबंधितांवर कडक कारवाई करण्याबरोबरच या प्रकरणातील मास्टर माईंड शोधण्याचे आश्‍वासन पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिल्यानंतर तणाव निवळला. दरम्यान, संबंधित युवकाला मदत करत असल्याच्या आरोपावरून सामाजिक कार्यकर्ते फिरोज पठाण यांच्या कार्यालयाची काच युवकांनी फोडली.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शहर पोलिस ठाण्यात सुरू होती. व्हायरल पोस्टसंदर्भात आपला कोणताही संबंध नसल्याचे फिरोज पठाण यांनी सांगितले आहे. स्वातंत्र्यदिनी एका अल्पवयीन युवकाने छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट केली होती, तसेच स्टेटसही ठेवण्यात आले होते.

त्याच दिवशी हवालदार सागर निकम यांच्या फिर्यादीनुसार संबंधित अल्पवयीन मुलावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान, याबाबतची माहिती मिळाल्यानंतर हजारो युवकांचा संतप्त जमाव काल सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमा झाला. जमावाचा आक्रमकपणा पाहून पोलिस फाटाही मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला.

समाजात धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या संबंधिताला ताब्यात घ्या, अन्यथा परिणाम भोगावे लागतील, असा इशारा आक्रमक जमावाने दिला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी काही काळ रास्ता रोको केला होता. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

पोलिसांनी समजूत घातल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचे निवेदन दिल्यानंतर जमाव पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानाकडे गेला. तेथेही मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पालकमंत्र्यांनी बाहेर येऊन आंदोलनातील प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली. या वेळी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

काही अल्पवयीन मुलांना हाताशी धरून महापुरुषांची बदनामी करण्याचा प्रकार घडला आहे. सायबर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा तपास केला जाईल, तसेच दोन समाजात तेढ व तणाव निर्माण करणाऱ्यांना शोधून काढून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. असे आश्‍वासन दिले, त्यामुळे जमाव शांत झाला. त्यानंतर शहरातील वातावरण निवळले.

फिरोज पठाण यांच्या कार्यालयाची तोडफोड

समाज माध्यमावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणारा तरुण शहरातील युवा नेते फिरोज पठाण यांचा नातेवाईक आहे. पठाण यांच्या राजकीय दबावामुळे पोलिसांनी या तरुणावर कमीत-कमी शिक्षेसाठी सौम्य कलमे लावल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे.

त्यामुळे या प्रकरणात फिरोज पठाण यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. त्यामुळे पठाण यांच्या घरावरही दुपारपासून पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सायंकाळी एका युवकाने पठाण यांच्या कार्यालयात तोडफोड केली. संबंधित युवकाला गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया शहर पोलिस ठाण्यात सुरू होती.

मी चुकीचा आढळलो, तर कारवाई करा : पठाण

छत्रपती शिवाजी महाराजांचा मी भक्त आहे. या आक्षेपार्ह पोस्टशी माझा कुठलाही संबंध नाही. राजकीय द्वेषापोटी विरोधकांनी माझ्यावर आरोप केले असून, राजकीय षड्‌यंत्र रचले आहे. या प्रकरणात मी चुकीचा आढळलो, तर पोलिसांनी माझ्यावर कारवाई करावी.

मास्टर माईंड शोधणार

सायबर विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा तपास केला जाईल, तसेच दोन समाजात तेढ व तणाव निर्माण करणाऱ्या मास्टर माईंडला शोधून काढून त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्‍वासन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आंदोलनकर्त्या युवकांशी बोलताना दिले. या आश्‍वासनानंतर तणाव निवळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडमध्ये कसोटी सामना पाहून भारावला, गिलबद्दलही बोलला; लक्ष्मणमुळे U19 टीम इंडियाला मिळाला स्पेशल अनुभव

पन्नाशीतही फिट दिसण्यासाठी ऐश्वर्या नारकर फॉलो करतात हे रुटीन ; "कढीपत्त्याचं पाणी आणि डाएटिंग..."

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

Yeola Railway Station : येवला रेल्वे स्थानकाची पाहणी; ४ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

SCROLL FOR NEXT