सातारा

पारधी वस्तीतून भाल्यासह कोयते, कुऱ्हाडी जप्त; चंदन तस्कराच्या मुसक्या आवळल्या

विलास साळूंखे

भुईंज (जि. सातारा) : सुरूर गावच्या हद्दीतील तीन जणांवर चाकूने हल्ला करून फरारी झालेल्या जकल्या रंग्या काळे यांच्यावर भुईंज पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी चंदन चोरीमध्ये फरारी असलेल्या ताराबाई रंग्या काळे व अभिता देवीचंद भोसले यांनी ताब्यात घेतले आहे. जकल्या काळेच्या हल्ल्यात स्वतः फिर्यादी राजेंद्र दादाराम मोहिते (रा. बेघरवस्ती सुरूर) व प्रकाश हरिचंद्र क्षीरसागर (रा. केंजळ), विश्वास जयसिंग बांदल (रा. मोहडेकरवाडी) हे तिघे जण जखमी झाले आहेत.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरूर (ता. वाई) येथील पारधीवस्तीतील जक्कल रंग्या काळे याने सुरूर बसथांब्यानजीक मुंबईला निघालेल्या विश्वास बांदल या व्यक्तीवर त्याच्या कुटुंबीयासमोर मारहाण केली, तरीही त्याच अवस्थेत बांदल कुटुंबीय मुंबईला रवाना झाले. त्यानंतर राजेंद्र मोहिते यांच्यावर त्याने खुनी हल्ला करीत प्रकाश क्षीरसागर यांनाही मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच सुरूर, वेळे, मोहडेकरवाडी, केंजळ परिसरातील युवकांनी जकल्याला काळेला पकडण्यासाठी धाव घेतली. या वेळी पोलिसांनी मोठी घटना घडू नये, म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता. युवकांनी त्याचा पाठलाग केला. मात्र, तो फरारी होण्यात यशस्वी झाला.

मी शेंगा खाल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही हेच पालिकेत आहे सुरु

तद्‌नंतर पोलिसांनी मोठ्या संख्येने कोंबिंग ऑपरेशन करून पारधी वस्तीतील घरातून दोन कोयते, चार कुऱ्हाडी, चार लोंखडी रॉड, दान लोखंडी भाला, एक लोखंडी पार, पक्कड एक, एक चाकू, एक गिरमिट, हातोडा, दोन बर्चे सुरी चाकू पाच अशी हत्यारे जप्त करून मागील दोन वर्षांपूर्वी चंदन तस्करीत फरारी असणाऱ्या ताराबाई रंग्या काळे व अभिता देविचंद भोसले यांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी उपअधीक्षक डॉ. शीतल जाणवे-खराडे, भुईंज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक आशिष कांबळे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

शिरसवडी- होळीचेगाव फाट्याजवळ डॉक्‍टरास मृत्यूने कवटाळले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis Bullet Ride : देवेंद्र फडणवीस बुलेटवरून विधानभवनात, इंधन बचतीसाठी मुख्यमंत्र्यांचा पुढाकार

तारिणी मालिकेत रेवाची एन्ट्री, केदार-तारिणीच्या आयुष्यात काय परिणाम होणार? अभिनेत्री म्हणाली...'हे सगळं माझ्यासाठी …'

Gold Rate Today: सरकारच्या इम्पोर्ट ड्युटी निर्णयानंतर सोन्याच्या भावात मोठा बदल! चांदी मात्र.. काय आहे ताजे भाव?

RCB vs KKR, Video: १९ वर्षांनंतरही तीच चपळाई! मनिष पांडेने हवेत झेपावून एका हाताने घेतला कॅच, विराटही झाला शॉक अन् मग...

Beed News: भावी शिक्षकांना आता नोकरीची संधी; पवित्र पोर्टलवरून ३१ मेपर्यंत जाहिराती प्रसिद्ध करण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT