Police Sakal
सातारा

Satara Police : 'तुझी खूप दादागिरी चाललीये'; पोलिसाचा पाठलाग करून लोखंडी पट्टी, लाकडी दांडक्याने मारहाण

याची तक्रार योगेश कृष्‍णात जाधव (रा. सातारा) या पोलिस कर्मचाऱ्याने नोंदवली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मारहाणीत योगेश जाधव यांच्‍या डोक्‍यास दुखापत झाली. मारहाणीनंतर ते चौघेही त्‍याठिकाणाहून निघून गेले.

सातारा : किरकोळ कारणावरून सातारा शहर वाहतूक शाखेतील (Satara City Police) कर्मचाऱ्याचा पाठलाग करत मारहाण केल्‍याप्रकरणी दुचाकीवरून आलेल्‍या चार अज्ञातांवर सातारा शहर पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे.

याची तक्रार योगेश कृष्‍णात जाधव (रा. सातारा) या पोलिस कर्मचाऱ्याने नोंदवली आहे. सातारा शहर वाहतूक नियंत्रण शाखेत योगेश जाधव हे कार्यरत आहेत. ते काल सकाळी ११ च्‍या सुमारास वायसी कॉलेज परिसरातून पोवई नाक्‍याकडे दुचाकीवरून येत होते.

त्‍यांचा पाठलाग करत दोन दुचाकीवरून चार युवक त्‍याठिकाणी आले. त्‍यांनी योगेश जाधव यांना अडवले. यानंतर त्‍या चौघांनी तू गल्‍लीत खूप दादागिरी करतो. तुझ्‍याशेजारी राहणाऱ्या दगडू पिसाळ, नितीन पिसाळ यांना दमदाटी करतो, असे म्‍हणत त्‍या चौघांनी योगेश जाधव यांना लाकडी दांडके, लोखंडी पट्टीने मारण्‍यास सुरुवात केली.

मारहाणीत योगेश जाधव यांच्‍या डोक्‍यास दुखापत झाली. मारहाणीनंतर ते चौघेही त्‍याठिकाणाहून निघून गेले. याची तक्रार रात्री जाधव यांनी सातारा शहर पोलिस ठाण्‍यात नोंदवली असून, अज्ञात चौघांवर मारहाणीचा गुन्‍हा नोंदविण्‍यात आला आहे. याचा तपास हवालदार भवारी हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT