pune bangalore highway accident 3 killed kolhapur police include traffic hospital sakal
सातारा

Satara : पुणे – बंगळूर महामार्गावरील ट्रक अपघातात 3 जागीच ठार; कोल्हापूर पोलिस दलातील एकाचा समावेश

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस, देखभाल विभागाचे पथक आणि तालुका पोलिस घटनास्थळी दाखल

हेमंत पवार

कऱ्हाड : पुणे – बंगळूर महामार्गावरील पाचवड फाटा (ता. कऱ्हाड) येथे चारचाकी आणि ट्रक यांचा आज शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास अपघात झाला. त्यात कोल्हापुरमधील चारचाकीतील एक महिला आणि दोन पुरुष ठार झाल्याची माहिती पोलिसांकडुन देण्यात आली. ठार झालेल्यामध्ये पोलिस दलातील एकाचा समावेश आहे.

याबाबत पोलिसांची माहिती अशी : पुणे-बंगळूरु महामार्गावर कऱ्हाड जवळील पाचवड फाटा येथे आज दुपारी दीडच्या सुमारास चारचाकी गाडी (एमएच ०१ एल ४५५८) कोल्हापुरकडुन मुंबईकडे निघाली होती. त्यादरम्यान चारचाकीने ट्रकला पाठीमागून जोरात धडक दिली. या भीषण धडकेत चारचाकी गाडीचा पुढील भाग हा ट्रकच्या पाठीमागील भागात घुसला. त्यामध्ये चारचाकीतील तीघांचा मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस, देखभाल विभागाचे पथक आणि तालुका पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी संबंधितांना पुढील उपचारासाठी हॉस्पीटलमध्ये हालवले. त्यादरम्यान पुणे-बेंगळुरु महामार्गावरील वाहतुक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. पोलिसांनी वाहतुक पुर्ववत करण्याची कार्यवाही सुरु केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT