Satara Bandh Maratha Reservation esakal
सातारा

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला! कऱ्हाड, साताऱ्याकडे येणाऱ्या ST बस बंद; महामंडळानं घेतला धसका

मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा सध्या चांगलाच पेटला आहे.

हेमंत पवार

मराठा आंदोलनाची धग सध्या वाढत चालली असून हे आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे.

कऱ्हाड : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा सध्या चांगलाच पेटला आहे. मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange-Patil) यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज सातारा बंदची हाक देण्यात आली आहे.

मात्र, त्याचा धसका एसटी प्रशासनाने (ST Bus) घेतला आहे. कोल्हापूर, सांगली, विटा, तासगावकडून कऱ्हाड, साताऱ्याकडे येणाऱ्या अनेक एसटी बस सकाळच्या टप्प्यात बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे.

मराठा आंदोलनाची धग सध्या वाढत चालली असून हे आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. त्यासाठी काल कऱ्हाडला मराठा समाजाचा मोर्चा काढण्यात आला. अनेक ठिकाणी जाळपोळ झाल्याच्या घटनाही घडल्या आहेत. मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज सातारा बंदची हाक देण्यात आली आहे.

त्यामुळे सकाळच्या टप्प्यात सातारा जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. दरम्यान, या बंदचा चांगलाच धसका एसटी प्रशासनाने घेतला आहे. बाहेरील आगारातून कऱ्हाड, साताऱ्याला येणाऱ्या काही एसटी बसच्या फेऱ्या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दोन्ही आगारात प्रवाशांची सध्या मोठी गर्दी झाली असून बसच नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होणार आहे.

अनेक बस बायपासने रवाना

कोल्हापूर, बेळगाव, सांगली, तासगाव, विटा, आटपाडी आगाराच्या कऱ्हाड, सातारा मार्गे जाणाऱ्या एसटी बस या सातारा जिल्हा बंदमुळे कऱ्हाड आणि सातारा शहरातील बसस्थानकात न नेता त्या बायपास मार्गाने पुणे-मुंबईला रवाना करण्यात येत आहेत. त्यामुळे बसस्थानकावरील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याच्या भावात घसरण! सणासुदीत 10 ग्रॅमचा भाव किती? पाहा ताजा दर

IND vs WI, ODI: रोहित शर्मा वेस्ट इंडिजविरुद्ध घालणार धुमाकूळ? सचिन, डिविलियर्सचे विक्रम मोडण्याची संधी

Kagal-Peth Naka Highway : पुणे-बंगळूर महामार्गावरील कागल ते पेठ नाक्यावर कोंडी कायम; मुदतवाढ देऊनही काम अपूर्णच, 51 टक्के कामानंतर जुना ठेका केला रद्द

Marathi News Live Updates : आशियाई क्रीडा स्पर्धेत हिमांशू ढिल्लनला रौप्य, तर रुद्रांक्ष पाटीलला कांस्य पदक

चाकरमान्यांची परतीच्या प्रवासात कोंडी! मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT