सातारा

शिवभक्ताला हाेणारी मारहाण खपवून घेणार नाही : उदयनराजे भाेसले

सकाळ वृत्तसेवा

सातारा : निराधार, गरीब लोकांना जेवण देण्याचं त्यांना न्याय देण्याचं काम करणारा जुन्नर तालुक्यातील अक्षय बोऱ्हाडे याच्यावरील हल्ला हा महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीस विचलीत करणारा आहे असे खासदार उदयनराजेंनी नमूद करुन  घडलेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला आहे.

जुन्नर तालुक्‍यातील साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्यावर
अक्षय बोऱ्हाडे या तरुणाने नुकतेच फेसबुक लाईव्हद्वारे मारहाणीचे आरोप केले हाेते. त्यानंतर साेशल मिडियातून अक्षयचे लाईव्ह माेठ्या प्रमाणात व्हायरल झाले. अनेकांनी अक्षयच्या कामाचे काैतुक करुन घडलेल्या घटनेची चाैकशी व्हावी अशी मागणी केली. 
 
भारतीय जनता पक्षाचे खासदार उदयनराजे भाेसले यांनीही या घटनेबाबत आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी अक्षयच्या सोशल मीडियातील व्हायरल व्हिडिआे बाबत आपल्या फेसबुकवर पोस्ट केली आहे की, जुन्नर तालुक्‍यातील शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून आधार देणारा युवक अक्षय बोऱ्हाडे याला काही राजकीय लोकांकडून बंदुकीचा धाक दाखवून अमानुष मारहाण करण्यात आली. छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वसा घेऊन असंख्य बेघर, मनोरुग्ण, अनाथ लोकांचे मनोभावे संगोपन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वताचे आयुष्य वाहून घेण्याचं काम या तरुणाने केलं. ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय निंदनीय आहे, याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो असं ते म्हणाले. 

उदयनराजे पुढे लिहितात पोलीस प्रशासनास आवाहन करतो की कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता लवकरात लवकर या घटनेची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करून या युवकास न्याय मिळवून द्यावा. सामाजिक जीवनात काम करत असताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो हे सर्वज्ञात आहे परंतु कोण राजकीय द्वेष तसेच वैयक्तिक कारणास्तव याप्रकारचे हल्ले करत असेल तर हे हल्ले महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीस नक्कीच विचलीत करणारे असतील,असेही खासदार उदयनराजेंनी नमूद केले आहे.

कोरोनात गुड न्यूज : सातारा जिल्ह्यात पावणेदोन लाख बेरोजगारांना नोकरीची संधी

सत्यशील शेरकर यांनी मारहाण केल्याचा तरुणाचा आरोप

अक्षय बोऱ्हाडे मारहाण प्रकरणी शेरकरांवर गुन्हा दाखल; सोशल मीडियात होतेय तुफान चर्चा!

ही पहा माणुसकीची झलक; जाणत्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी

सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Budget Alcohol Rate: मद्यप्रेमींना मोठा धक्का! दारूचे दर महागणार; बजेटनंतर किमती किती वाढणार? जाणून घ्या...

U19 WC, IND vs PAK: ५ बॉलमध्ये मोठा ड्रामा! वैभव सूर्यवंशीला एकाच बॉलवर दोनदा जीवदान अन् मग भारताच्या पडल्या तीन विकेट्स

Latest Marathi News Union Budget 2026 ट्रॉम्बेतील DBM केंद्रात माजी विद्यार्थिनींचा गौरव; १२० जणींच्या यशकथा ठरल्या प्रेरणादायी

8th Pay Commission: अर्थसंकल्प झाला, ८ व्या वेतन आयोगाबाबत काय निर्णय? केंद्रीय कर्मचाऱ्यांची वेतनवाढ नेमकी कधी?

Education Budget 2026: देशात 3 आयुर्वेद संस्था आणि 5 युनिव्हर्सिटी टाउनशिप विकसित होणार; बजेट 2026 मध्ये शिक्षण क्षेत्राला काय मिळालं?

SCROLL FOR NEXT