Satara Latest Marathi News 
सातारा

जावळीतील गावांचा पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लावणार : शिवेंद्रसिंहराजे

गिरीश चव्हाण

सातारा : जावळीतील गावांचा पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लागणे आवश्‍यक असून, या प्रकल्पाला पाणी आरक्षण मंजुरी मिळाली आहे. आगामी काळात शासनस्तरावर पाठपुरावा करून कोणत्याही परिस्थितीत बोंडारवाडी प्रकल्प मार्गी लावू, असे आश्‍वासन आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बोंडारवाडी धरण निर्माण समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिला. 

जावळी तालुक्‍यातील गावांच्या पाणीप्रश्‍नासाठी ग्रामस्थांनी बोंडारवाडी धरण निर्माण समितीची स्थापना केली आहे. या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची भेट घेऊन बोंडारवाडी धरण प्रकल्पाबाबत चर्चा केली. या वेळी रामभाऊ शेलार, मोहनराव कासुर्डे, जिल्हा परिषद सदस्या अर्चना रांजणे, पंचायत समिती सदस्य विजय सुतार, कांताताई सुतार, प्रवीण महाराज शेलार यांच्यासह काळोशी, निझरे, करंजे, आंबेघर, आसनी गावांतील पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते. 

या वेळी शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, "नुकत्याच झालेल्या अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. बैठकीत महिनाभरात परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना अजित पवार यांनी जलसंपदा विभागास केल्याचे सांगत इतर सुरू असणाऱ्या इतर प्रशासकीय कार्यवाहीची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली.'' माहिती ऐकून समितीच्या सदस्यांनी शिवेंद्रसिंहराजेंच्या माध्यमातून प्रकल्प मार्गी लागेल, असा विश्‍वास व्यक्‍त केला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Update : भारतात मॉन्सून वाटचालीस अनुकूल वातावरण, हवामान विभागाचा अंदाज अचूक; बंगालच्या उपसागरात तीव्रता वाढली

SIR Voter List : निवडणूक आयोगाचा मास्टरप्लॅन! बिहार, बंगालनंतर आता महाराष्ट्र-दिल्लीसह 'या' राज्यांत होणार मतदार याद्यांची सखोल तपासणी; 36 कोटी मतदारांवर लक्ष

मला लागेल ना बाबा... वैभव सूर्यवंशीसारखं बनवण्याचा हट्टापायी चिमुकल्याला पालकांनी जबरदस्तीने करयाला लावली बॅटिंग; वेगात येणारे चेंडू पाहून...

'अनुष्काचं आता वय दिसायला लागलंय' नव्या जाहिरातीतील अनुष्का शर्माचा लूक पाहून नेटकरी म्हणाले...'अरे ही ओळखता पण...'

जयवंत वाडकर यांच्या लेकीचं शुभमंगल! मल्याळी बॉयफ्रेंडसोबत थाटामाटात बांधली लग्नगाठ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT