सातारा

चिंताजनक! जावळी तालुक्यात कोरोनाचा पुन्हा शिरकाव; भागात कंटेन्मेंट झोन जाहीर

महेश बारटक्के

कुडाळ (जि. सातारा) : जावळी तालुका कोरोनामुक्तीच्या वाटेवर असतानाच मागील आठवड्यापासून तालुक्‍यात पुन्हा नव्याने कोरोनाने डोके वर काढल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. यामुळे कोरोनाचे नवीन रुग्ण सापडत असून, नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. 

गेल्या मार्च महिन्यापासून सुरू असलेली कोरोनाची महामारी जाऊन हळूहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर येत असताना गेल्या आठवड्यापासून काही काळ थांबलेला कोरोनाचा प्रसार पुन्हा एकदा जोर धरू लागला आहे. नागरिकांचा बेजबाबदारपणाच याला कारणीभूत ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे. वाढती गर्दी, आठवडे बाजार, लग्न समारंभ, यात्रा, धार्मिक कार्यक्रम आदींना लोकांची ये- जा सुरू झाली. अशातच कोरोना आता संपला, असे म्हणून लोकही बिनधास्त वावरू लागले. नाकावरचा मास्क अलगद तोंडाखाली येऊ लागला. सामाजिक अंतराचे नियम काहिसे शिथिल होत सगळीकडेच मोकळेपणा जाणवायला लागला होता. 

शासनाकडून लसीकरण मोहीम सुरू झाल्याने आता कोरोना पळून गेला असेच काहींना वाटू लागले. मात्र, गेल्या आठवड्यात तालुक्‍यातील कावडी या ठिकाणी कोरोनाचे नवे रुग्ण सापडल्याने सारेच खडबडून जागे झाले. भागातील करहर, करंदी तर्फ कुडाळ, म्हसवे, आर्डे, करंजे, कुडाळ या ठिकाणी नवीन रुग्ण सापडले आहेत. यासाठी सर्वांनीच सावधानता बाळगली पाहिजे. आरोग्य विभागाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करायला हवे, अन्यथा पुन्हा एकदा लॉकडाउनला सामोरे जायला लागण्याची भीती व्यक्त होत आहे. 

"मागील आठवडाभरापासून तालुक्‍यात कोरोनाचे नवीन रुग्ण सापडत आहेत. आरोग्य विभागाचे यावर बारकाईने लक्ष असून, ज्याठिकणी अधिक संख्या आहे, तेथे कंटेन्मेंट झोन केला आहे. तालुक्‍यातील 18 आरोग्य समुदाय अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक गावात पूर्वीप्रमाणे जनजागृती करण्याचे काम सुरू आहे. नागरिकांनी विनामास्क फिरू नये. सामाजिक अंतराचे पालन करावे आणि वारंवार साबणाने हात धुवावेत तसेच अनावश्‍यक गर्दीही करू नये.'' 

-डॉ. भगवान मोहिते, वैद्यकीय अधिकारी, जावळी तालुका  

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुण्यात एकाच वेळी दोघांनी संपवले जीवन, तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले, घटनेने खळबळ

Latest Marathi News Updates : विजेचा धक्का लागून शेतकऱ्यासह दोन बैलांचा मृत्यू

Mumbai Politics: पलावात आमदारांनी घर घ्यावे, म्हणजे उठलं की जाता येईल, ठाकरे गटाचा शिंदेसेनेच्या आमदारांना टोला

"माझ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध" पंचायत फेम अभिनेत्यावर पत्नीने केलेले गंभीर आरोप

Demat Account: शेअर बाजाराची क्रेझ कमी होत आहे का? डीमॅट अकाउंट बंद करण्याचे प्रमाण वाढले, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT