karad
karad 
सातारा

सातारा जिल्ह्यात तिघांचा मृत्यू; 16 रुग्ण कोरोनामुक्त

प्रविण जाधव

सातारा : सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालये व कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेले 16 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले. दरम्यान, तीन बाधितांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची संख्या 65 वर गेली आहे. 

दिवसभरात घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांमध्ये वाई तालुक्‍यातील सह्याद्रीनगरातील 39 वर्षीय महिला व 30, 60 वर्षीय पुरुष, कवठे येथील 28 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, ओझर्डे येथील 39 वर्षीय महिला, चिंधवलीतील 28 वर्षीय पुरुष, माण तालुक्‍यातील काळेवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, म्हसवडमधील 26 वर्षीय महिला, 11 वर्षीय बालिका व 50, 27 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्‍यातील नागठाणेमधील 45 वर्षीय महिला, कऱ्हाड तालुक्‍यातील मलकापुरातील 29 वर्षीय पुरुष, येळगावमधील 28 वर्षीय महिला व विद्यानगर-सैदापूर येथील 26 वर्षीय महिलेचा समावेश आहे. 

दरम्यान, जिल्ह्यातील तीन बाधितांचा आज मृत्यू झाला. त्यामध्ये कृष्णा हॉस्पिटलमध्ये (कऱ्हाड) उपचार सुरू असलेल्या पाटण तालुक्‍यातील कुंभारगाव येथील 42 वर्षीय पुरुष, कऱ्हाड तालुक्‍यातील लटकेवाडी-सावडे येथील 52 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. फलटण तालुक्‍यातील पाडेगाव येथील 62 वर्षीय पुरुषाचा बुधवारी (ता. 8) मृत्यू झाला. त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले होते. तो अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

एकूण 561 संशयितांचे नमुने तपासणीला 
जिल्ह्यातून आज 561 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यामध्ये जिल्हा रुग्णालयातील 18, कृष्णा हॉस्पिटलमधील 42, कऱ्हाड उपजिल्हा रुग्णालयातील 77, फलटणमधील 43, कोरेगाव सेंटरमधील 37, वाईतील 42, शिरवळ येथील 164, रायगावमधील 17, पानमळेवाडी येथील 10, मायणीतील 13, दहिवडी येथील 56, खावली सेंटरमधील 24, तळमावलेतील 18 जणांचा समावेश असल्याची माहिती डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

(संपादन ः संजय साळुंखे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT