Traffic Jam on Pune-Bengaluru Highway
Traffic Jam on Pune-Bengaluru Highway esakal
सातारा

Traffic Jam : महत्वाची बातमी! पुणे-बेंगळुरु महामार्गावर वाहतूक ठप्प; वाहनांच्या 10 किलोमीटर लांब रांगा

सकाळ डिजिटल टीम

आज परीक्षार्थी विद्यार्थ्यांना या ट्रॅफिक जामचा फटका बसणार आहे.

कराड : पुणे-बेंगळुरु महामार्गावर कराडजवळ ट्रॅफिक जाम (Traffic Jam on Pune-Bengaluru Highway) वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या आहेत. गेल्या 3 तासांहून अधिक काळ वाहतूक खोळंबली असल्याने प्रवासी आणि वाहनचालक चांगलेच संतापले आहेत.

कराड जवळ महामार्गावर वाहनांच्या 10 किलोमीटरहून अधिक लांब रांगा लागलेल्या आहेत. आज परीक्षार्थी विद्यार्थ्यांना या ट्रॅफिक जामचा मोठा फटका बसणार आहे.

पुणे-बेंगळुरु आशियाई महामार्गावर कराड येथील कृष्णा हॉस्पिटल (Krishna Hospital) समोरील उड्डाणपूल पाडण्यासाठी पुलावरून वाहतूक व्यवस्था वळविण्यात आल्याने कराड शहरात जोडणाऱ्या सर्व सेवा रस्त्यावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प होऊन कोलमडून गेली. यामुळं महामार्गावर दोन्ही दिशेला सुमारे दहा किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

या वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांना बसला आहे. गेली महिनाभरापासून कराड येथील मुख्य प्रवेशद्वारासमोरील उड्डाणपूल पाडण्याचं काम वेगात सुरू असून पुल पाडण्याचं काम पूर्णत्वास आलं आहे. कृष्णा हॉस्पिटल समोरील पूल पाडण्याच्या कामास सुरुवात करण्यात येणार असल्याने आज पासून या पुलावरून सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती.

पेठकडून कराडकर कराडकडं जाणारी सर्व वाहनं कोयना वसाहत मलकापूरच्या बाजू कडील सेवा रस्त्यानं कोल्हापूर नाका ते पुढे कोयना पूल वारुंजी फाटा ते पुढे महामार्गावर वाहतूक वळविण्यात आले आहे. तर, कराड कडून पेठच्या दिशेनं जाणारी वाहनं देखील कराड येथील कृष्णा हॉस्पिटल समोरील सेवा रस्त्यानं वळविण्यात आली आहे. परिणामी, सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चक्काजाम झाला आहे. दरम्यान, ढेबेवाडी फाट्यावरील वाहतूक बंद करण्यासाठी लावण्यात आलेले बॅरिकेट काढून वाहतूक पोलिसांनी तो उड्डाणपुलावरील मार्ग वाहतुकीसाठी खुला केला आहे, त्यामुळं वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येवू लागली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT