Power esakal
सातारा

कऱ्हाडात वादळी वाऱ्यासह 'मुसळधार'; ऑक्‍सिजन लेव्हल कमी होऊन रुग्णांना धाप

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस त्यामध्ये भरच पडत आहे.

हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : सातारा जिल्ह्याला दरवर्षी अवकाळीचा मोठा तडाखा बसत असतो. त्यामुळे येथील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही होते. यंदा शेतकऱ्यांना कोरोनाचा आणि त्यातही ह्या अवकाळीच्या तडाख्याने बळीराजा पुरता हैराण झालाय. या अवकाळीने विजेवरही 'घाव' घालण्यास सुरुवात केल्याने कऱ्हाडातील प्रत्येक घरात विजेचा 'खोळंबा' जाणवत आहे. काल रात्री घरातील वीज गेल्याने मी पुरता हैराण झालो. सर्वत्र कोळोख होता. त्यात घरी दिवाही नव्हता, वन्यजीवांची भीतीही वाटत होती, हा दररोजचाच 'काळोख' सुरु असल्याने शेतकऱ्यांत सध्या भीतीचे वातावरण पहायला मिळत आहे.

वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटाने काल (ता. 26) रात्री शहरासह परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यामध्ये अनेक ठिकाणी झाडे पडून वीज वाहिन्यांचे नुकसान झाले. त्यामुळे शहरासह परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला. सध्या कोरोनाबाधितांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नसल्याने अनेकांना घरीच विजेवर चालणारी पोर्टेबल ऑक्‍सिजनची मशिन लावण्यात आली आहेत. मात्र, काल रात्री तब्बल अडीच तासांहून अधिक काळ वीज खंडित झाल्याने अनेकांच्या या ऑक्‍सिजन मशिन बंद झाल्या. त्यामुळे अनेक रुग्णांची ऑक्‍सिजन लेव्हल कमी होऊन अनेकांना धाप लागला.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस त्यामध्ये भरच पडत आहे. कोरोना चाचणीसह अँटीजेन चाचणीही वाढवण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र, त्या तुलनेत हॉस्पिटलमध्ये बेडची संख्या उपलब्ध नाही. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. त्यातून घरीच पोर्टेबल ऑक्‍सिजन यंत्र नेत रुग्णांना कृत्रिम श्वास दिला जात आहे. शहरासह तालुक्‍यातील पन्नासहून अधिक रुग्णांना या यंत्राद्वारे ऑक्‍सिजन पुरवठा सुरू आहे. त्यामुळेच संबंधित रुग्ण बेड मिळेपर्यंत तग धरू शकले आहेत. काल रात्री अचानक वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट झाला. पाऊस तुरळक असला तरी वाऱ्याचा जोर मोठा असल्याने कोळे, कालवडे, विंग, कोळेवाडी, वडगाव हवेली, काले, बारा डबरी परिसरात अनेक ठिकाणी झाडे पडून वीज वाहिन्यांचे नुकसान झाले.

काही ठिकाणी विजेचे खांबांचे नुकसान झाले. त्यामुळे वीजप्रवाह खंडित झाला. त्याचा मोठा फटका घरी विजेवरील पोर्टेबल ऑक्‍सिजनची मशिन लावलेल्या कोरोनाबाधित रुग्णांना बसला. पावसाने वीज गेल्याने अनेकांच्या ऑक्‍सिजन मशिन बंद पडल्या. त्यामुळे ऑक्‍सिजनअभावी अनेक रुग्णांना धाप लागली. दोन- अडीच तासांनंतर वीजपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर या रुग्णांना पुन्हा यंत्राद्वारे ऑक्‍सिजन मिळाला. दरम्यानच्या काळात काही रुग्णांची अवस्था गंभीर झाली. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरची गरज निर्माण झाली आहे. त्यासाठी त्यांच्या नातेवाइकांची हॉस्पिटलमध्ये बेडसाठी धावाधाव सुरू आहे.

पर्यायी व्यवस्था करण्याची गरज

कोरोनाग्रस्त रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत. त्यासाठी ज्यांना घरीच पोर्टेबल ऑक्‍सिजन यंत्र लावले तरी चालतील, अशांना घरीच ती लावली आहेत. त्याद्वारे ऑक्‍सिजन त्यांना देण्यात येत असतानाच काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्याने वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे घरात मशिन लावलेल्यांना ऑक्‍सिजन मिळाली नाही. त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय झाली. त्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांनी लाइटच्या पर्यायी व्यवस्थेची तयारी करणे गरजेचे असल्याचे त्यातून समोर आले आहे.

Edited By : Balkrishna Madhale

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT