Realme Narzo 50 Sakal
विज्ञान-तंत्र

12 हजारांत स्मार्टफोन, मिळेल 6000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरा

सकाळ डिजिटल टीम

आगामी फेस्टिव्हल सीजनसाठी स्मार्टफोन कंपन्या सज्ज झाल्या आहेत. या काळात अनेक नवीन स्मार्टफोन लाँच कणरण्यात येते आहेत, दिवसेंदीवस 50 एमपी कॅमेरा फोनची वाढती मागणी पाहाता तुमच्यासाठी बजेटमध्ये बसतील असे अनेक स्मार्टफोनची लॉंच होत आहेत. आज आपण अशाच काही 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी सपोर्ट देण्यात येत असलेल्या काही स्मार्टफोन्स बद्दल जाणून घेणार आहोत.

Realme Narzo 50

Realme narzo 50A या स्मार्टफोनमध्ये 6.5-इंच मिनी-ड्रॉप डिस्प्ले दिला असून फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. त्याचा मुख्य कॅमेरा हा 50MP आहे, तर 2MP चे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. फोनला 8 एमपीचा सेल्फी कॅमेरा देण्यात मिळेल. फोनमध्ये प्रोसेसर म्हणून ऑक्टा-कोर MediaTek Helio G85 सपोर्ट देण्यात आला आहे. Realme narzo 50A मध्ये 6000mAh ची बॅटरी दिली असून ती फोनमध्ये रिव्हर्स चार्जिंग आणि 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनमध्ये तुम्हाला फिंगरप्रिंट सेन्सर तसेच, दोन सिम कार्ड आणि एक एसडी कार्ड (256GB पर्यंत) असे 3-कार्ड स्लॉट दिले आहेत. या फोनची किंमत ही 11,499

Infinix Hot 11s

Infinix Hot 11s या स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा FHD+ डिस्प्ले दिलेला आहे. त्याचा रिफ्रेश रेट 90Hz, स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 90.5 टक्के आणि टच सॅम्पलिंग रेट 180Hz आहे. फोनमध्ये MediaTek Helio G88 प्रोसेसर दिले असून फोनला लेटेस्ट Android 11 आधारित XOS 7.6 साठी सपोर्ट मिळेल. स्मार्टफोनमध्ये 50MP AI ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंटला 8 एमपी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर या फोनच्या कॅमेऱ्याने 2K Bokeh व्हिडिओ रेकॉर्ड केला जाऊ शकतो. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आहे, जी 18W चार्जरने चार्ज केली जाऊ शकते. यासोबतच कनेक्टिव्हिटीसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट, जीपीएस, ब्लूटूथ आणि वाय-फाय सारखी सुविधा देण्यात आली आहे. किंमत - 10,499 रुपये

Realme C25Y

Realme C25Y स्मार्टफोनमध्ये 6.5-इंच HD प्लस डिस्प्ले दिला असून हा फोन Android 11 आधारित Realme R Edition वर काम करतो. या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर तसेच युनिसोक टी 610 प्रोसेसरचा डिव्हाइस सपोर्ट असेल. Realme C25Y स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेरा दिला असून यामध्ये 2MP मॅक्रो आणि ब्लॅक अँड व्हाईट सेन्सर दिला आहे. याशिवाय फोनच्या फ्रंटला 8 एमपी कॅमेरा असेल. 5000mAh ची बॅटरी, वाय-फाय, GPS, ब्लूटूथ, 4G VoLTE आणि 3.5mm हेडफोन जॅक फोनमध्ये देण्यात आला आहे. या फोनची किंमत 10,999 रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates: भारत पाक क्रिकेट सामन्याला विरोध शिवसेना महिला आघाडीच्या वतीने निदर्शने

Leopard Terror: 'आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी डोंगरी भागात बिबट्याचा सलग तीन दिवसांचा वावर': परिसरात भीतीचे वातावरण

Solapur Rain update: 'साेलापूर शहरातील रस्त्यावरुन वाहू लागल्या नद्या'; शनिवारी शहरात ३२.६ मिमी पाऊस; तीन दिवसांपासून ड्रेनेज तुंबलेलेच

Northeast India Earthquake: ईशान्य भारत भूकंपाने हादरला, बंगालपासून भूतानपर्यंतही जाणवले धक्के

IND vs AUS, ODI: स्मृती मानधनासह दोघींची अर्धशतकं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध इतिहासात पहिल्यांदाच घडला 'असा' पराक्रम

SCROLL FOR NEXT