Aliens
Aliens esakal
विज्ञान-तंत्र

Aliens : हॅलो हॅलो... एलिअन्स कॉलिंग...! गुढ वाढलं

सकाळ डिजिटल टीम

Aliens Calling Mistry : ब्रह्मांडात पृथ्वीप्रमाणेच इतर ग्रहांवरही जीवसृष्टी असू शकते असं आपण अनेकदा ऐकलं, सिनेमातून पाहिलं आहे. पण शास्त्रज्ञांना अजून त्याचे ठोस पूरावे मिळाले नाहीत. पण या रोचक गोष्टीला अद्याप कोणी अमान्यपण केलेलं नाही.

कोई मिल गया, पिके असे सिनेमे तुम्ही बघितले असतीलच. कोई मिल गयामध्ये जसे रेडिओ सिग्नल्स स्पेसमध्ये पाठवले किंवा मिळाले तसेच काहीसे घडत असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे.

पृथ्वी वासियांशी संवादाचा एलिअन्सचा प्रयत्न?

शास्त्रज्ञांना अवकाशातून काही सिग्नल्स येत आहेत. याविषयी अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत. ते सिग्नल्स एलिअन्स देत आहेत? असाही एक तर्क लावला जात आहे. जसे आपण इतर ग्रहांवर जीवसृष्टीचा शोध घेत आहोत तसाच शोध घेत एलिअन्स तर सिग्नल पाठवत नाही ना? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे.

रहस्यमयी सिग्नल्स

पृथ्वीवर २००० रहस्यमयी सिग्नल्स येत असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं. त्यामुळे एलिअन्स बद्दल कुतूहल वाढलं आहे. हे सिग्नल्स साधारण रेडिओ सिग्नलपेक्षा वेगळे असल्याचं शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. या गुढाची उकल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. विशेष म्हणजे हे सिग्नल एकाच दिशेने येत आहेत.

सिग्नल्स विषयीचे फॅक्ट्स

  • ज्या दिशेने सिग्नल्स येतात त्या दिशेला सतत ९१ तास लक्ष ठेवलं

  • ८२ तासात १ हजार ८६३ सिग्नल्स मिळाले.

  • त्या ठिकाणाला २०२०११२४ A असं नाव दिले आहे.

  • सिग्नल चीनच्या ५०० मीटर अपर्चर स्फेरिकल रेडिओ टेलिस्कोपनं नोंदवले आहेत.

  • दर ०.२ इतक्या अति प्रचंड वेगाने सिग्नल येतात.

पहिल्या रेडिओ सिग्नलचा शोध

पहिल्या रेडिओ सिग्नलचा शोध १५ वर्षापूर्वी लागला होता. मॅग्नेट या न्यूट्रॉन स्टारकडून सिग्नल येत असल्याचा अंदाज त्यावेळी शास्त्रज्ञांनी वर्तवला होता. न्यूट्रॉन स्टर म्हणजे प्रचंड मोठ्या ताऱ्याचा कोसळलेला भाग असतो.

सिग्नल विषयी अभ्यास

चीनमधले खगोल शास्त्रज्ञ याचा अभ्यास करत आहेत. सिग्नल डी कोड झाले सिग्नल नेमका कुठून आणि कसला आहे हे समजेल. यातून एलिअन्सचा पत्ता लागला तर मोठा चमत्कारच घडेल.

तज्ज्ञांचे मत

हे सिग्नल पल्सार, मॅग्नेटिक स्टार्स, गुरूत्विय तारे यांच्याकडून आलेले आहेत की अजून काही हे अभ्यासांतीच कळू शकेल असे खगोल शास्त्रज्ञांचं मत आहे. त्यावर अभ्यास सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parli Bogus Voting Video : परळीतल्या बोगस मतदानाच्या क्लिप व्हायरल; रोहित पवारांचे गंभीर आरोप, म्हणाले...

Ebrahim Raisi: इराणच्या अध्यक्षांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरचा अझरबैजानमध्ये अपघात, बचावपथक रवाना

Praful Patel : ''होय, 2004 पासून भाजपशी युती व्हावी म्हणून मी आग्रही होतो'', प्रफुल्ल पटेलांनी सगळाच इतिहास काढला

SRH vs PBKS : अभिषेक-क्लासेनची शानदार खेळी, हैदराबाद विजयासह प्लेऑफमध्ये; मात्र पंजाबची पराभवासह सांगता

Farooq Abdullah: फारुख अब्दुल्लांच्या सभेत चाकूहल्ला; 3 कार्यकर्ते जखमी, दोघांची स्थिती गंभीर

SCROLL FOR NEXT