Apple Device esakal
विज्ञान-तंत्र

Apple चा नेमका प्लान काय? फोल्डिंग डिव्हाइस लवकरच लाँच करण्याच्या तयारीत, पण..

रिपोर्ट्सनुसार आता अ‍ॅपलचा सुद्धा या यादीत समावेश होणार आहे.

साक्षी राऊत

Apple Device : मार्केटमध्ये नवनव्या फोल्डिंग फोन्सची एन्ट्री सुरुच असताना आता वाट आहे ती अ‍ॅपलच्या फोल्डिंग फोनची. सॅससंगने त्यांचा पहिला फोल्डिंग फोन लाँच केला होता. त्यानंतर या यादीत शाओमी, ओपो आणि वन प्लस यांसारखे फोन आलेत. रिपोर्ट्सनुसार आता अ‍ॅपलचा सुद्धा या यादीत समावेश होणार आहे.

अ‍ॅपल कंपनी फोल्डिंग फोन लाँच करणार नसून रिपोर्टनुसार कंपनी फोल्डिंग आयपॅड लाँच करण्याची शक्यता आहे. याचे उत्पादन पुढल्या वर्षी सुरु होण्याची शक्यता आहे. अनेक कंपन्या जिथे फोल्डिंग फोनवर फोकस करताय तिथे अ‍ॅपल कंपनीचा काही वेगळा प्लान असल्याचे दिसून येते.

आतापर्यंत फोल्डिंग टॅबलेट कोणीही लाँच केलेला नाही

मार्केटमध्ये अनेक फोल्डिंग लॅपटॉपसुद्धा उपलब्ध आहेत. लेनोव्हो सारख्या ब्रँड्सने त्यांचे फोल्डिंग फोन्स आधीच लाँच केले आहेत. मात्र टॅबलेटसाठी असे कुठलेही ऑप्शन उपलब्ध नाही.

कंपनी दरवर्षी त्यांचे वेगवेगळे फोल्डिंग फोन्स लाँच करत आहेत. सॅमसंगने ही सीरीज सुरूच ठेवली आहे. DigiTimes च्या रिपोर्टच्या मते, अ‍ॅपल त्यांच्या पहिल्या फोल्डिंग iPad साठी सप्लायर्स आणि लाइन-अप तयार करत आहे.

काय आहे अॅपलचा प्लान?

अॅपल त्यांचे उत्पादन सुरुवातीला छोटेखानी ठेवणार आहे. सप्लाय चैनने असा दावा केलाय की फोल्डिंग iPad चे प्रोडक्शन २०२४ च्या शेवटी सुरु करण्याची शक्यता आहे. अॅपलने आतापर्यंत फोल्डिंग आयपॅड डिझाइन सबमिट केलेले नाही.

कंपनी ही डिझाइन आयफोनवर वापरण्याआधी सगळ्यात आधी डिव्हायसेसवर ट्राय करणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT