Apple Vision Pro
Apple Vision Pro Esakal
विज्ञान-तंत्र

Apple Vision Pro : हॉलिवूडपटातील टेक्नॉलॉजी उतरली सत्यात! अ‍ॅपलने लाँच केला हेडसेट, पाहा व्हिडिओ

Sudesh

अव्हेंजर्स किंवा आयर्न मॅन चित्रपटात तुम्ही पाहिलं असेल, की त्यातले हीरो हवेतच कम्प्युटरवरील फीचर्स वापरतात. कम्प्युटरच्या स्क्रीनऐवजी हवेतच एक स्क्रीन येते आणि त्यावर लोक काम करतात. हे सगळं आता केवळ सिनेमापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. अ‍ॅपलच्या व्हिजन प्रोमुळे (Vision Pro) आता हे सगळं सत्यात उतरलं आहे.

अ‍ॅपलने गेल्या काही वर्षांमध्ये नवीन प्रॉडक्ट तयार केलं नव्हतं. मात्र, यावर्षीच्या WWDC मध्ये अ‍ॅपलने आपला व्हर्चुअल रिअ‍ॅलिटी हेडसेट (WWDC23 Vision Pro) सादर केला. व्हिजन प्रो असं नाव असलेल्या या हेडसेटची प्रतिक्षा कित्येक महिन्यांपासून टेक फॅन्सना होती.

असे आहेत फीचर्स

व्हिजन प्रोच्या वापरताना यूजर्स त्यांचे डोळे, डोकं आणि आवाजाच्या माध्यमातून कमांड्स देऊ शकणार आहेत. विशेष म्हणजे, कम्प्युटरवर असणारे डिजिटल अ‍ॅप्स, मूव्हीज, फोटो आणि इतर बराच कंटेंट यूजर्स खऱ्या जगात ओव्हरले करू शकतील. उदाहरण द्यायचं झाल्यास, तुम्ही तुमच्या समोरच - कोणतीही स्क्रीन नसतानाही एखादी मूव्ही प्रोजेक्ट करू शकाल.

अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांनी हा हेडसेट म्हणजे एक क्रांतिकारी प्रॉडक्ट असल्याचं म्हटलं. लोकांच्या आयुष्यातील टेक्नॉलॉजीची भूमिका हा हेडसेट बदलेल, असंही ते म्हणाले. "हा दिवस पाहण्यामागे गेल्या अनेक वर्षांची मेहनत आहे. डिजिटल कंटेंट खऱ्या जगात आणणे हे आपण यापूर्वी कधीही पााहिलं नाही. व्हिजन प्रो (Vision Pro Features) हा एक नवीन कम्प्युटिंग प्रोग्राम आहे." असं मत टिम यांनी व्यक्त केलं.

3D कॅमेरा उपलब्ध

या हेडसेटमध्ये एक थ्री-डी कॅमेरा देखील देण्यात आला आहे. त्यामुळे हा हेडसेट घातलेली व्यक्ती आपल्या आजूबाजूच्या गोष्टींचा एक थ्री-डी व्हिडिओही तयार करू शकेल.

गेमिंगचा उत्कृष्ट अनुभव

या हेडसेटमुळे यूजर्सना टीव्ही शो आणि गेमिंगचा अगदी उत्कृष्ट अनुभव येईल. जणू तुम्ही स्वतः गेममध्ये उपस्थित आहात, अशा प्रकारे तुम्ही गेम खेळू शकाल.

डिस्नेसोबत टाय-अप

अ‍ॅपलने या हेडसेट साठी डिस्नेसोबत टायअप केलं आहे. यामुळे स्टार वॉर्स सारखे डिस्ने-हॉटस्टारवरील शो, किंवा स्पोर्ट्स चॅम्पियनशिप्स तुम्हाला नव्या आणि अनोख्या पद्धतीने पाहता येणार आहेत. यासोबतच, घरबसल्या डिजिटल डिस्नेलँडची सफरही तुम्ही या माध्यमातून करू शकता.

सर्वांना नाही परवडणार

दरम्यान, या हेडसेटच्या फीचर्सचं कौतुक करत असताना नेटिझन्स याच्या किंमतीबाबत नाराजीही व्यक्त करत आहेत. याची सुरुवातीची किंमत 3,499 डॉलर्स एवढी निश्चित करण्यात आली आहे. तर, पुढील वर्षीच्या सुरूवातीला याची विक्री सुरू होईल, असं सांगण्यात आलं. एवढ्या महागड्या किंमतीमुळे हा हेडसेट सर्वांनाच परवडणार नाही, हे नक्की.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol, Diesel Rates : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? सरकारचा 'टॅक्स'संदर्भात मोठा निर्णय

SRH vs GT Live Score : गुजरात जाता जाता हैदराबादला धक्का देणार की SRH प्ले ऑफचं तिकीट सेफ करणार?

मोठी बातमी! पिंपरी चिंचवडच्या मोशीमध्ये होर्डिंग कोसळलं; अनेक गाड्या दबल्या

Amit Shah : ..म्हणून PFI वर बंदी घातली! बिहारमध्ये गृहमंत्री अमित शाहांचा खुलासा; म्हणाले...

Bengaluru Crime: बाथरुममध्ये गळा चिरलेल्या अवस्थेत आढळला तरुणीचा मृतदेह! आई आहे मानवाधिकार कार्यकर्ता

SCROLL FOR NEXT