Apple Watch Series 8
Apple Watch Series 8 google
विज्ञान-तंत्र

Appleचे घड्याळ देणार heart attackचा इशारा

नमिता धुरी

मुंबई : आजच्या युगात इलेक्ट्रॉनिक उपकरणांनी आपले जीवन खूप सोपे केले आहे. आता कोणतेही काम करण्यासाठी कष्ट करण्याची गरज नाही. मोठ्या टेक कंपन्यांपैकी एक Apple येत्या काही महिन्यांत आयफोन १४ सीरीजचे अनावरण करणार आहे, तर दुसरीकडे, Apple यावर्षी Apple Watch Series 8 नावाचे नवीन स्मार्टवॉच लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

लॉन्च होण्यापूर्वी स्मार्टवॉचचे अनेक फीचर्स लीक झाले आहेत. Apple ने नुकताच त्यांचा WWDC 2022 इव्हेंट आयोजित केला होता, ज्यामध्ये त्यांनी नवीन M2 समर्थित मॅकबुकची घोषणा केली. Apple WWDC 2022 इव्हेंटमध्ये, या स्मार्टवॉचच्या अनेक वैशिष्ट्यांविषयी माहिती समोर आली आहे, ज्यामुळे जीव वाचू शकतो. चला तर मग या फीचर्सबद्दल सविस्तर माहिती घेऊ.

नुकत्याच झालेल्या इव्‍हेंटमध्‍ये Apple ने त्‍याच्‍या स्‍मार्टवॉचसाठी नवीन ऑपरेटिंग सिस्‍टम, watchOS 9 ची घोषणा केली आहे. या ऑपरेटिंग सिस्टिमच्या मदतीने स्मार्टवॉचमध्ये अनेक वैशिष्ट्ये पाहायला मिळतील. या फीचरच्या मदतीने आता लोकांना हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकाराची अगोदरच माहिती मिळणार आहे. watchOS 9 अंतर्गत एक नवीन बायोमॉनिटरिंग सेन्सर समाविष्ट केला आहे, जो AFib बर्डन डिटेक्शनसाठी उपयुक्त ठरेल. अॅपलचे हे वैशिष्ट्य लोकांना त्यांच्या हृदयाचे ठोके सामान्य नसल्यास सूचित करेल. लीक झालेले अहवाल सूचित करतात की नवीन Apple Watch Series 8, जी या वर्षाच्या शेवटी लॉन्च होण्याची अपेक्षा आहे, एखादी व्यक्ती किती वेळा अॅट्रियल फायब्रिलेशन स्थितीत आहे यावर लक्ष ठेवू शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha: "विशाल पाटलांवर शिवसेनेचा अन्याय"; भाजपचे केंद्रीय मंत्री काय बोलून गेले...

Raghuram Rajan: संपत्ती वितरणाबाबत रघुराम राजन यांचे वक्तव्य चर्चेत; म्हणाले, ''श्रीमंतांवर कर...''

KKR vs DC : कोलकत्याच्या मार्गात दिल्लीचा अडथळा! सुनील नारायणचा पुन्हा दिसणार ‘वन मॅन शो’.... की जेक फ्रेसर मॅर्कगर्क घालणार तांडव

Latest Marathi News Live Update: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सोलापुरात सभा

दहा मिनिटांमध्ये लिहिलेल्या मंगलाष्टका अन् मोहन जोशींचा किस्सा; 'असा' शूट झाला होता राधा-घनाच्या लग्नाचा एपिसोड

SCROLL FOR NEXT