Bihar’s Rituraj Chaudhary Hack Google Story  
विज्ञान-तंत्र

का कही... बिहारी बाबूनं चक्क गुगलची चूक शोधली

ऋतुराज हा आय आय टी मणिपूर येथील 'बी टेक' च्या द्वितीय वर्षाला शिकणारा विद्यार्थी आहे

सकाळ डिजिटल टीम

बिहारमधील एका मुलाने चक्क गुगल हॅक केल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर फिरत आहेत. गुगल (Google) हॅक केल्यानंतर त्या मुलाला कंपनीकडून कोट्यवधींच्या पगार देत नोकरीची (Job) ऑफर दिल्याचे एका अहवालात म्हटले आहे. हा ऋतुराज नेमका कोण... ज्याने गुगलला हादरवून टाकलं. ऋतुराज हा आय आय टी मणिपूर येथील 'बी टेक' च्या द्वितीय वर्षाला शिकणारा विद्यार्थी (Student) आहे. आणि बेगुसराय शहराजवळ असलेल्या मुंगेरगंज नावाच्या खेड्याचा रहिवासी आहे.

ऋतुराजने नेमकं केलं काय?

मीडियाच्या माहितीनुसार, ऋतुराजला चार दिवसांपूर्वी सर्च इंजिन गुगलमध्ये एक बग सापडला. या बगमुळे हॅकर्सना गुगलच्या सिक्युरिटी सिस्टीममध्ये प्रवेश करून कंपनीचा महत्त्वाचा डेटा लीक करणे सोपे होते. त्यामुळे गुगलचे मोठे नुकसान होऊ शकले असते. त्यामुळे त्याने त्याने ५१ सेकंदांपर्यन्त गुगल इंजिन हॅक करून बग शोधला. पण, ५१ सेकंदानंतर ऋतुराजने गुगल फ्री करून इंजिनची सेवा पुन्हा पुर्ववत सुरू केली. त्यानंतर त्याने गुगल ला मेल करून तक्रार केली. वर हेही सांगितले की गुगलच्या कोणत्या चुकीमुळे तो त्याने हे काम केले. म्हणजेच त्या बगमुळे हॅकर्सना गुगल सर्च इंजिनमध्ये प्रवेश करणे सोपे झाले होते. मेल मधे ऋतुराजने दिलेल्या सर्व तपशीलानुसार तिथल्या अधिकाऱ्यांनीही १ सेकंदासाठी गुगल हॅक करून पाहिलं आणि त्यांना तांत्रिक उणिवेची खात्री पटली. टेक जायंटनेही त्याबाबत ही माहिती योग्य असल्याचे सांगितले. त्यामुळे ऋतुराजला त्याच्या या शोधासाठी गुगलने बक्षीस देण्याचा निर्णय घेतला.

ऋतुराजने गुगलच्या डेटाबेसमध्ये हा संभाव्य धोका शोधून काढल्याबद्दल Google ने त्याला Google हॉल ऑफ फेम पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ऋतुराजचे नाव त्यांच्या संशोधकाच्या यादीत टाकले आहे. तसेच गुगलने ऋतुराजला 'जॉईनींग लेटर ' देत ३.६६ कोटी रूपयांचे नोकरीचे पॅकेज दिले आहे.

मात्र, या प्रकरणाच्या खोलात गेल्यावर असे कळले की त्याने गुगल हॅक केलेले नाही आणि त्याला कंपनीकडून अशी कोणतीही नोकरीची ऑफर मिळालेली नाही, परंतु संशोधक म्हणून इतर फायदे मिळाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Opening: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; सेन्सेक्स 254 अंकांनी वाढला, कोणते शेअर्स चमकले?

Rasha Thadani: रवीना टंडनची कन्या राशा आता तेलुगू चित्रपटात

Ladki Bahin Yojana : ऑगस्ट महिना संपायला ६ दिवस बाकी... लाडक्या बहिणीचा हप्ता कधी जमा होणार?

Latest Marathi News Updates : देवेंद्र फडणवीस हे वोटचोर, अपात्र महिलांना १५०० रुपये देऊन मते विकत घेतली, ठाकरे गटाची टीका

Pune News : सीएनजी ‘हायड्रो टेस्टिंग’चे दर तब्बल चारपट वाढले; चालकांमध्ये नाराजी, आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT