Rishabh Pant
Rishabh Pant Sakal
विज्ञान-तंत्र

Rishabh Pant: ऋषभ चालवत असलेली कार सुरक्षेच्याबाबतीत आहे अव्वल, मिळतात जबरदस्त सेफ्टी फीचर्स

सकाळ डिजिटल टीम

Rishabh Pant accident: भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतचा दिल्लीजवळ अपघात झाला आहे. दिल्लीवरून घरी परतत असताना रुडकी येथील नारसन बॉर्डर जवळ त्याच्या कारचा अपघात झाला. या अपघातात ऋषभच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. कारची काच फोडून त्याला गाडीतून बाहेर काढण्यात आले. यानंतर कारने पेट घेतला.

कारमध्ये ऋषभ एकटाच होता व स्वतः गाडी चालवत होता. यावेळी तो Mercedes-Benz GLE Coupe 43 AMG 4Matic ही गाडी चालवत होता. ज्या ठिकाणी त्याचा अपघात झाला, तो ब्लॅकस्पॉट आहे. अपघातानंतर त्याला डेहरादून येथील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ऋषभ चालवत असलेल्या मर्सिडिज बेंझच्या कारमध्ये कोणकोणते सेफ्टी फीचर्स मिळतात याविषयी जाणून घेऊया.

हेही वाचा: Apple iPhone 15: लाँचआधीच iPhone 15 चे फीचर्स लीक, किंमतीचाही खुलासा; पाहा संपूर्ण डिटेल्स

Mercedes-Benz GLE Coupe 43 AMG 4Matic कारची किंमत

मर्सिडीज बेंझच्या या कारची किंमत १ कोटी रुपयांपासून ते १.१५ कोटी रुपयांपर्यंत आहे. कारमध्ये अनेक शानदार सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.

हेही वाचा: क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

Mercedes-Benz GLE Coupe 43 AMG 4Matic कारचे फीचर्स

मर्सिडीजच्या या कारमध्ये २९९६सीसी V Type पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, हे इंजिन ६१००आरपीएमवर ३८४ बीएचपी पॉवर आणि २०००-४२०० आरपीएमवर ५२०एनएम टॉर्क जनरेट करते. इंजिन ऑटोमेटिक ट्रान्समिशनसह येते. कारमध्ये ५ व्यक्ती सहज बसू शकतात.

यामध्ये तुम्ही सेफ्टीसाठी अनेक शानदार फीचर्स मिळतील. यामध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग, सिस्टम ब्रेक असिस्टेंट, सेंट्रल लॉकिंग पॉवर, डोर लॉक्स, चाइल्ड सेफ्टी लॉक्स, ड्राइव्हर एअरबॅग्स, पॅसेंजर एअरबॅग्स, Side Airbag-Front,Side Airbag-Rear सारखे सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत.

याशिवाय, कारमध्ये व्हीकल स्टेबिलिटी कंट्रोल, सिस्टम इंजिन इमोबिलाइजर, क्रॅश सेंसर देखील देण्यात आले आहेत.

हेही वाचा: Airtel Offer: एअरटेल यूजर्सला मोफत देत आहे तब्बल 50GB डेटा, जाणून घ्या कसा मिळेल फायदा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT