Power Bank Sakal
विज्ञान-तंत्र

Power Bank: भन्नाट! बाजारात आले हटके डिव्हाइस, आता चक्क उन्हात चार्ज होणार स्मार्टफोन-लॅपटॉप

बाजारात एक खास पॉवर बँक लाँच झाला असून, जो उन्हात सहज चार्ज होतो. या पॉवर बँकद्वारे तुम्ही स्मार्टफोन, लॅपटॉपला देखील चार्ज करू शकता.

सकाळ डिजिटल टीम

Dexpole Solar Power Bank Details: स्मार्टफोन आणि लॅपटॉप सारखे गॅजेट्स हे आपल्या दैनंदिन आयुष्याचे भाग झाले आहेत. अनेक कामे स्मार्टफोन व लॅपटॉपच्या माध्यमातून सहज करता येतात. मात्र, या डिव्हाइसची प्रमुख समस्या ही चार्जिंग असते. वारंवार चार्जिंग संपत असल्याने कामात अडथळा येतो. बाजारात पॉवर बँक देखील उपलब्ध आहेत. परंतु, या पॉवर बँकला देखील वारंवार चार्ज करावे लागते. मात्र, आता काळजी करण्याची कारण नाही. बाजारात एक खास पॉवर बँक बँक लाँच झाला आहे, जो चक्क उन्हात चार्ज होईल.

हेही वाचा - First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

Dexpole Solar Power Bank चे स्पेसिफिकेशन्स

Dexpole नावाच्या एका कंपनीने सोलर पॉलर बँकसाठी कॅम्पेन सुरू केले आहे. यामध्ये ६५ वॉट USB-C चार्जिंग सपोर्ट दिला आहे. पॉवर बँक सोलर बॅटरीसह येतो. यामुळे डिव्हाइस उन्हात सहज चार्ज होते. Dexpole Solar Power Bank मध्ये २४००० mAh ची दमदार बॅटरी दिली आहे. याच्या सोलर प्लेटच्या मदतीने डिव्हाइस ५ तासात फुल चार्ज होईल. याचे डिझाइन देखील आकर्षक आहे. याच्या सोलर प्लेटच्या मदतीने डिव्हाइस ५ तासात फुल चार्ज होईल. याचे डिझाइन देखील आकर्षक आहे.

Dexpole Solar Power Bank चे फीचर्स

Dexpole Solar Power Bank मध्ये चार सोलर पॅनेल दिले आहेत. यात वॉल सॉकेटची देखील सुविधा दिली असून, याद्वारे डिव्हाइसला २ तासात फुल चार्ज करू शकता. डिव्हाइसमध्ये एलईडी डिस्प्ले दिला असून, याद्वारे किती चार्जिंग झाली याची माहिती मिळते. हा पॉवर बँक iPhone 14 Pro Max ला ४ वेळा, तर iPad Pro ला दोन वेळा सहज चार्ज करू शकतो. याचे वजन देखील फक्त १.२ किलो आहे. विशेष म्हणजे पॉवर बँक पाण्यात देखील खराब होत नाही.

Dexpole Solar Power Bank ची किंमत

सध्या Dexpole Solar Power Bank वर ४१ टक्के डिस्काउंट दिले जात आहे. याची किंमत १४६ डॉलर (जवळपास ११,८७१ रुपये) आहे. या पॉवर बँकचा वापर तुम्ही कोठेही करू शकता. कंपनी यावर १ वर्षाची वॉरंटी आणि लाइफटाइम कस्टमर सपोर्ट देत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vande Bharat Train Food : ‘वंदे भारत रेल्वे’त प्रवाशांना आता स्थानिक पदार्थ दिले जाणार ; रेल्वेमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Messi and Revanth Reddy Football Video : लिओनेल मेस्सीने हैदराबादेत मुख्यमंत्री रेवंत रेड्डींसोबत खेळला फुटबॉल; हजारो चाहत्यांचा उत्साह शिगेला!

PMC Retired Employees : निवृत्तीनंतर दिलासा; २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना पुन्हा मोफत वैद्यकीय उपचार!

Pune Health : कर्करोग निदानासाठी पुणेकरांना मोठा दिलासा; महापालिकेचे पेट स्कॅन सेंटर सुरू; खासगी रुग्णालयांपेक्षा निम्म्या खर्चात!

Soybean MSP : आधारभूत किमत खरेदीत शेतकऱ्यांवर अन्याय नको; आमदार डॉ. संजय कुटे यांनी अधिवेशनात मांडली ठाम भूमिका!

SCROLL FOR NEXT