Samsung Smartphone Sakal
विज्ञान-तंत्र

Smartphone Offer: भारी ऑफर! जुना फोन द्या अन् Samsung चा हँडसेट अवघ्या १ हजारात घरी घेऊन जा, पाहा डिटेल्स

नववर्षाच्या निमित्ताने सॅमसंगने लोकप्रिय बजेट स्मार्टफोन Galaxy M32 Prime Edition वर ऑफरची घोषणा केली आहे. या फोनला तुम्ही ई-कॉमर्स साइट Amazon वरून स्वस्तात खरेदी करू शकता.

सकाळ डिजिटल टीम

Offer On Galaxy M32 Prime Edition: भारतीयांमध्ये Samsung चे स्मार्टफोन्स विशेष लोकप्रिय आहेत. कंपनीच्या कमी बजेटमध्ये येणाऱ्या फोन्सला ग्राहकांची विशेष पसंती मिळते. आता कंपनीने नववर्षाच्या निमित्ताने आपल्या लोकप्रिय बजेट स्मार्टफोन Galaxy M32 Prime Edition वर ऑफरची घोषणा केली आहे. या फोनला तुम्ही ई-कॉमर्स साइट Amazon वरून स्वस्तात खरेदी करू शकता. फोनवरील या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Samsung Galaxy M32 Prime Edition ची किंमत आणि ऑफर्स

Samsung Galaxy M32 Prime Edition स्मार्टफोन ई-कॉमर्स साइट Amazon वर १३,४९९ रुपये किंमतीत उपलब्ध आहे. यावर तुम्हाला वेगवेगळ्या ऑफर्सचा फायदा मिळेल. HSBC बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ३०० रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. याशिवाय, एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे.

सॅमसंगच्या या फोनवर तुम्हाला १२,६५० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल. परंतु, ही ऑफर तुमच्या जुन्या फोनच्या लेटेस्ट मॉडेल आणि कंडिशनवर अवलंबून आहे. या ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास सॅमसंगच्या या फोनला फक्त ८५० रुपयात खरेदी करता येईल.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Samsung Galaxy M32 Prime Edition चे स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy M32 Prime Edition फोनमध्ये ६.४ इंच एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. तसेच, मीडियाटेक हीलियो जी८० प्रोसेसरसह ६ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल.

फोनमध्ये फोटोग्राफीसाठी क्वाड-कॅमेरा सेटअप दिला असून, यात ६४ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा, २ मेगापिक्सल मॅक्रो कॅमेरा आणि २ मेगापिक्सल डेप्थ सेंसर मिळेल. पॉवर बॅकअपसाठी २५ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ६००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. मात्र, फोनसोबत बॉक्समध्ये १५ वॉटचा चार्जर मिळतो.

हेही वाचा: Datsun Redi Go: नववर्ष साजरे करा धुमधडाक्यात, दरमहिना फक्त ८ हजार द्या अन् घरी घेऊन जा ४ लाखांची कार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Picnic Bus accident : भीषण अपघात! विद्यार्थ्यांना सहलीवरून परत आणणारी बस जम्मूत उलटली

Ishan Kishan: पुण्याच्या मैदानात सिलेक्टरला बॅट दाखवली, वर्ल्डकपच्या संघात एन्ट्री घेतली; ईशान किशनच्या स्वप्नवत पुनरागमनाची गोष्ट

Nora Fatehi Accident: अभिनेत्री नोरा फतेहीचा अपघात, डोक्याला दुखापत; मद्यधुंद कार चालकाने दिली धडक!

Palghar News : पालघरमध्ये पाच वर्षीय मुलीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार; बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

Velhe Accident : तीव्र उतारावर नियंत्रण सुटले अन् टेम्पो पलटी; पाबे घाटात भीषण अपघात; १३ मजुर जखमी!

SCROLL FOR NEXT