Hero Super Splendor XTEC
Hero Super Splendor XTEC google
विज्ञान-तंत्र

Hero Super Splendor XTEC लॉन्च, जबरदस्त मायलेज आणि फोनशी करता येणार कनेक्ट

नमिता धुरी

मुंबई : Hero MotoCorp ने ग्राहकांसाठी नवीन Hero Super Splendor XTEC मोटरसायकल लाँच केलीय. कंपनीने ही हीरो बाईक बऱ्याच स्टाइलिंग अपडेट्स आणि प्रीमियम कनेक्टिव्हिटी फीचर्ससह लॉन्च केलीय.

त्यामुळे Hero MotoCorp च्या या नव्या बाईकच्या किमतीपासून ते या नवीन बाईकमध्ये तुम्हाला कोणते फीचर्स पाहायला मिळतील यापर्यंत सगळी माहिती तुम्हाला वाचायला मिळणार आहे. (features of Hero Super Splendor XTEC launch ) हेही वाचा - परदेशातही वापरता येणार युपीआय सुविधा...वाचा सविस्तर

कंपनीने आपल्या ग्राहकांचा विचार करून ही हीरो मोटरसायकल दोन प्रकारात लॉन्च केली आहे. या बाईकच्या ड्रम ब्रेक व्हेरिएंटची किंमत 83 हजार 368 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली), तर डिस्क ब्रेक व्हेरिएंटची किंमत 87 हजार 268 रुपये आहे. (एक्स-शोरूम, दिल्ली)

भारतातील तरुणांची मागणी लक्षात घेऊन Hero Super Splendor XTEC अद्ययावत करण्यात आल्याचा दावा Hero MotoCorp ने केलाय.

या नवीन बाईकमध्ये कंपनीने हाय इंटेन्सिटी पोझिशनिंग लॅम्पसह एलईडी हेडलॅम्प, तसेच कमी फ्युएल इंडिकेटरसह पूर्णपणे डिजिटल स्पीडोमीटर, सर्व्हिस रिमाइंडर आणि बाईकमध्ये काही बिघाड असल्यास त्यासाठी इंडिकेटरही दिले आहेत.

या नव्या हिरो मोटरसायकलमध्ये कंपनीने कॉल आणि एसएमएस अलर्टसह ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी फीचर दिले आहे.

125 सीसी सेगमेंटमध्ये लॉन्च करण्यात आलेल्या या कम्युटर बाईकमध्ये ड्युअल टोन स्ट्राइप देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे या बाईकचे डिझाईन जरा जास्तच चांगले दिसत आहे. याशिवाय या बाइकला यूएसबी पोर्ट देण्यात आलाय, ज्याच्या मदतीने बाईक चालवतानाही मोबाईल फोन चार्जिंग करू शकता.

125 cc BS6 इंजिनसह येणारी, ही बाईक 68kmpl चा मायलेज देईल. तसेच या बाईकचे इंजिन 7500rpm वर 10.7bhp पॉवर आणि 6000rpm वर 10.6Nm चा पीक टॉर्क जनरेट करते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT