Flying Car Model A
Flying Car Model A eSakal
विज्ञान-तंत्र

Flying Car : आता जमिनीवरून थेट हवेत न्या गाडी! जगातील पहिल्या उडणाऱ्या कारला मिळाली सरकारची परवानगी

Sudesh

तुम्ही आतापर्यंत सायन्स फिक्शन चित्रपटांमध्ये उडणाऱ्या गाड्या पाहिल्या असतील. शास्त्रज्ञ अशा गाड्या बनवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही तुम्ही ऐकलं असेल. मात्र, आता ही कल्पना प्रत्यक्षात उतरली आहे. अमेरिका सरकारने अशा प्रकारच्या एका कारला अधिकृतरित्या परवानगी दिली आहे. (World's first flying Car)

अमेरिकेतील अलेफ एअरोनॉटिक्स कंपनीने तयार केलेल्या या उडणाऱ्या कारला तिथल्या सरकारने मंजूरी दिली आहे. या कारचं नाव 'मॉडेल ए' असं ठेवण्यात आलं आहे. यूएस फेडरल एव्हिएशन अ‍ॅडमिनिस्ट्रेशनने (FAA) या गाडीला 'स्पेशल एअरवर्थीनेस' सर्टिफिकेशन दिलं आहे. अशा प्रकारच्या वाहनाला मंजूरी मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे, त्यामुळे हा निर्णय ऐतिहासिक मानला जातोय. (US Government Flying Car)

अलेफ एअरोनॉटिक्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या गाडीच्या टेकऑफ आणि लँडिंग नियमांसाठी, तसेच eVTOL आणि ग्राऊंड इन्फ्रास्ट्रक्चर यांच्यातील परस्पर संवाद नियंत्रित करण्यासाठी असलेल्या नियमांवर सरकार काम करत आहे. केवळ ठराविक कारणास्तव आणि ठराविक ठिकाणीच या गाड्यांना उडण्याची परवानगी देण्यात आली आहे, असंही कंपनीने स्पष्ट केलं. (Alef Aeronautics)

कशी आहे कार?

ही गाडी तुम्ही रस्त्यावर आणि हवेत अशा दोन्ही ठिकाणी चालवू शकाल. त्यामुळे मोकळ्या रस्त्यावर तुम्ही ही कार पळवू शकता, आणि ट्रॅफिकमध्ये सर्वांच्या वरून निघून जाण्यासाठीही तुम्ही याचा वापर करू शकता. ही गाडी इलेक्ट्रिक आहे, आणि याची रेंज सुमारे ३२२ किलोमीटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. तसेच या कारची फ्लाईंग रेंज ही सुमारे १७७ किलोमीटर असल्याचं कंपनीने म्हटलं आहे.

किती असेल किंमत?

फॉक्स न्यूज या अमेरिकेतील वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, या कारची (Alef Model A) अंदाजे किंमत ही ३,००,००० डॉलर्स एवढी असू शकते. या कारमध्ये एक किंवा दोन व्यक्ती प्रवास करू शकतात.

अलेफ एअरोनॉटिक्स ही कंपनी अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यात आहे. ऑटोमोटिव्ह आणि एव्हिएशन क्षेत्रात ही कंपनी कार्यरत आहे. एनडीटीव्हीने दिलेल्या एका रिपोर्टनुसार २०२५ च्या शेवटीपर्यंत ही उडणारी कार डिलिव्हर करण्याचं कंपनीचं लक्ष्य आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात प्री-ऑर्डर झाल्याचंही कंपनीचे सीईओ जिम ड्युखोव्हनी यांनी स्पष्ट केलं आहे.

ही गाडी नियमित वापरासाठी तयार करण्यात येत आहे. त्यामुळे, नेहमीच्या रस्त्यांवरुन तुम्ही तिला वापरू शकाल. तसेच तुम्ही तुमची गाडी आता जिथे पार्क करता, तिथेच ही कारही पार्क करू शकाल. किंवा मग तुमच्या आताच्या गॅरेजमध्ये ही कार ठेऊ शकाल. यासाठी तुम्हाला विशेष काहीही करायची गरज नाही, असं कंपनीच्या वेबसाईटवर म्हटलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Accident: नागपुरात आणखी एक कार अपघात! अल्पवयीन कार चालकाने पाच जणांना उडवलं, अल्पवयीन कारचालकासह...

Shubman Gill : दोस्त दोस्त ना रहा... गिलने कर्णधार रोहितला केलं अनफॉलो, मोठं कारण आलं समोर

Rudraprayag Accident: एक डुलकी अन् क्षणात बस कोसळली दरीत...१४ जणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Stock Market Exit Polls : ‘एक्झिट पोल’च्या परिणामाची चौकशी करा;तृणमूलची मागणी,शिष्टमंडळ सेबी अध्यक्षांना भेटणार

Weather Update : पावसाचा हायअलर्ट! राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा, वाचा हवामान विभागाचा अंदाज

SCROLL FOR NEXT