Honda Activa 6G to get a digital console and connectivity features check details here rak94
Honda Activa 6G to get a digital console and connectivity features check details here rak94 
विज्ञान-तंत्र

Honda Activa 6G : आता चावी शिवाय सुरू होणार Activa; येत आहेत भन्नाट फीचर्स

सकाळ डिजिटल टीम

आता Honda Activa 6G टू-व्हीलरमध्ये डिजिटल कन्सोल आणि कनेक्टिव्हिटीचे ऑप्शन मिळणार आहेत. होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष आणि सीईओ अत्सुशी ओगाटा यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की Activa 7G सादर करण्याऐवजी Activa 6G पूर्णपणे अपडेट करण्याचा कंपनीचा प्रयत्न असेल.

त्यामुळे, Honda Activa 6G या विभागात स्पर्धात्मक राहील. Honda Activa 6G डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि कनेक्टिव्हिटी फीचर्स अपडेट केले जातील. Activa 6G ची स्पर्धा Hero Xoom 110 आणि TVS Jupiter शी आहे.

या दोन्ही बाईक मध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरने आधीच सुसज्ज आहेत. त्यामुळे Honda सुद्धा Honda Activa 6G मध्ये हे फीचर्स अपडेट करण्याची तयारी करत आहे. सध्या, Honda Activa 6G ची एक्स-शोरूम किंमत 74,536 ते 80,537 (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. याशिवाय Honda ने अलीकडेच H-Smart तंत्रज्ञानासह Activa 6G अपडेट केली आहे.

चावीशिवाय लॉक-अनलॉक होईल

रिपोर्ट्सनुसार, कंपनीने दावा केलाय की स्कूटरला Find फीचर देण्यात येणार आहे. फिजिकल की न वापरता स्कूटर लॉक आणि अनलॉक करण्यासाठी स्मार्ट की देण्यात येईल. या स्मार्ट कीचा वापर करून स्कूटरचे इंजिन चावीपासून 2 मीटरच्या आत असताना सुरू करता येते. हे इंजिन स्टार्ट आणि स्टॉप स्विचसह देखील येते.

होंडाची सर्वात स्वस्त मोटरसायकल

होंडा मोटरसायकल आणि स्कूटर इंडियाने अलीकडेच भारतीय बाजारपेठेत शाइन 100 लाँच केली आहे. भारतीय बाजारात कंपनीची ही सर्वात स्वस्त मोटरसायकल आहे. या मोटरसायकलची किंमत 64,900 रुपयांपासून सुरू होते. ही मोटारसायकल शहराच्या रहदारीत दैनंदिन वापरासाठी खास तयार करण्यात आली आहे. हीरो स्प्लेंडर प्लस, बजाज प्लॅटिना 100 आणि TVS स्टार सिटी प्लस या मोटारसायकलला टक्कर देईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT