Honda Shine Sakal
विज्ञान-तंत्र

1 कोटी लोकांनी खरेदी केलीये 'ही' बाईक; 5999 रुपयांमध्ये आणू शकता घरी

आतापर्यंत १ कोटीहून अधिक लोकांनी 'होण्डा शाईन' बाईकची खरेदी केली आहे.

सकाळ डिजिटल टीम

आतापर्यंत १ कोटीहून अधिक लोकांनी 'होण्डा शाईन' बाईकची खरेदी केली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनी या बाईकवर अनेक प्रकारच्या ऑफर्स आणत असते. ज्या ग्राहकांना ही बाईक खरेदी करायची आहे, मात्र बजेटची समस्या आहे ते लोक केवळ 5,999 रुपयांच्या डाउन पेमेंटसह देखील खरेदी करू शकतात आणि उरलेली रक्कम हप्त्यामध्ये (EMI) फेडू शकतात. (Honda Shine ; most successful bike in India in 125cc segment)

Honda Shine किंमत आणि EMI-

Honda Shine दोन प्रकारात येते. तिच्या ड्रम ब्रेक वेरिएंटची किंमत 76,314 रुपये आणि डिस्क ब्रेक व्हेरिएंटची किंमत 80,314 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. जर आपण EMI वर गाडी घ्यायची म्हटले तर शाईनचं बेसिक मॉडेल 90 रुपयांपर्यंत जाईल. तुम्ही 6000 रुपये डाउन पेमेंट भरल्यास आणि 3 वर्षांचा कार्यकाळ निवडल्यास, तुमचा मासिक EMI सुमारे रु. 2,700 असेल.

Honda Shine 125 ची वैशिष्ट्ये-

वैशिष्ट्यांबद्दल बोलायचे तर, शाईनमध्ये साइड स्टँड इंजिन कट-ऑफ स्विच, इंजिन स्टार्ट-स्टॉप स्विच, अॅडजस्टेबल सस्पेंशन मिळते. बाइकला वेग, ओडोमीटर आणि इंधन मीटर यांसारखी माहिती दर्शविणारा एक इन्स्ट्रुमेंटेशन क्लस्टर आहे. Honda Shine 125 मध्ये 124cc सिंगल-सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन आहे. हे इंजिन 10.7PS चा पॉवर आणि 11Nm पर्यंत टॉर्क देते. या इंजिनमध्ये होंडाचा एसीजी (अल्टरनेटर करंट जनरेटर) सायलेंट स्टार्टरचा पर्याय उपलब्ध आहे. इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nashik Municipal Election : नाशिकमध्ये शिवसेनेची हवा! ११ पैकी ५ नगरपालिकांवर भगवा; त्र्यंबकेश्वरमध्ये भाजपला मोठा धक्का

मीच नाही तर सोहमही त्याचं घर सोडून आलाय... लग्नानंतरच्या बदललेल्या आयुष्याबद्दल पूजा बिरारीचा खुलासा, म्हणते-

VIDEO : शाळेत मानसिक छळ, लिंगभेद आणि अपमानास्पद वागणूक; शिक्षिकेचा भावनिक व्हिडिओ व्हायरल, सोशल मीडियावर संताप

Bike Helmet Tips: हेल्मेट घातल्यावर गुदमरल्यासारखे होतय? 'हे' 5 उपाय करतील मदत

Shubman Gill साठी गौतम गंभीर, अजित आगरकर आग्रही होता, पण 'ते' दोघं नको म्हणाले अन् T20 World Cup संघातून पत्ता कट झाला

SCROLL FOR NEXT