Private Video leak
Private Video leak esakal
विज्ञान-तंत्र

MMS किंवा प्रायव्हेट व्हिडिओ लीक झाल्यास वेबसाइट किंवा सोशल मीडियावरून कसा डिलीट कराल?

साक्षी राऊत

Private Video leak : हल्ली सोशल मीडियावर प्रायव्हेट व्हिडिओ क्लिप्स, एमएमएस सोशल मीडियावर व्हायरल होण्याचे प्रमाण वाढतच चालले आहे. अलीकडेच एका राजकीय नेत्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सगळीकडे या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. त्यामुळे तुमचे प्रायव्हेट व्हिडिओज किंवा फोटोज सोशल सुरक्षित ठेवणे हे आता अनेकांपुढचं मोठं आव्हान असणार आहे. तेव्हा MMS किंवा प्रायव्हेट व्हिडिओ लीक झाल्यास वेबसाइट किंवा सोशल मीडियावरून कसा डिलीट करावा याबाबत सविस्तर जाणून घ्या.

जर व्हिडिओ लीक होत असतील तर ते व्हिडिओ अनेक वेबसाइटवर अपलोडही केले जातात. अशा स्थितीत व्हिडिओ व्हायरल होण्याची शक्यता खूपच वाढते. परंतु, काही स्टेप्स फॉलो करून तुम्ही पॉर्न साइट्स किंवा सोशल मीडिया वेबसाइट्सवर अपलोड केलेले व्हिडिओ किंवा फोटोही काढून घेऊ शकता.

स्थानिक पोलिस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार नोंदवणे हाच उत्तम पर्याय आहे. मात्र, त्यासाठी बराच वेळ लागेल. यामुळे, तुम्ही साइटच्या मालकाशी संपर्क साधून व्हिडिओ डिलीट करू शकता.

वेबसाइट मालकाशी संपर्क साधावा लागेल

बहुतेक वेबसाइट कॉपीराइट धोरणाचे पालन करतात. यामुळे त्या अशा पोस्ट लगेच काढून टाकते. आपण वेबसाइटच्या मालकाशी संपर्क साधू शकत नसल्यास, पर्यावी मार्ग निवडावा.

यासाठी तुम्ही थर्ड पार्टी वेबसाइट www.whois.com ची मदत घेऊ शकता. कोणत्याही साइटचे डोमेन नेम एंटर केल्यानंतर बहुतेक प्रकरणांमध्ये त्याचे संपूर्ण तपशील उपलब्ध असतात. त्यानंतर तुम्ही साइट मालकाशी संपर्क साधून व्हिडिओ काढण्याची विनंती करू शकता.

कोणत्याही पॉर्न साइटवर व्हिडिओ अपलोड केला असेल तर तो काढणे सोपे जाते. यासाठी, व्हिडिओच्या खाली तक्रार करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. यासह, तुम्ही व्हिडिओबद्दल माहिती सबमिट करू शकता आणि तुम्हाला तो का काढायचा आहे याबाबतही डिटेल्स देऊ शकता. या सगळ्या माहितीसह, साइट मालक व्हिडिओ काढून घेऊ शकतो.

Google सर्च रिझल्टमधूनही तुम्ही काँटेंट काढून टाकू शकता

गुगल सर्च रिझल्टमध्ये कोणताही आक्षेपार्ह फोटो किंवा व्हिडीओ दिसत असल्यास तुम्ही तो काढून टाकू शकता. यासाठी तुम्हाला गुगलशी संपर्क साधावा लागेल. यासाठी तुम्ही https://support.google.com/blogger/contact/private_info या साइटला भेट देणे आवश्यक आहे.

याशिवाय, तुम्ही येथे क्लिक करून थेट साइटवर प्रवेश करू शकता. यामध्ये महिलांना सायबर क्राईमच्या विरोधात खूप मदत केली जाते.

तुमच्या इच्छेविरुद्ध एखादा फोटो किंवा व्हिडिओ ब्लॉगवर दिसत असेल, तर गुगल तुम्हाला त्यातही मदत करेल. यासाठी तुम्हाला https://support.google.com/blogger/contact/private_info वर जावे लागेल. तुम्ही थेट येथे क्लिक करून ही साइट उघडू शकता. अशावेळी पोलिसही तुम्हाला मदत करतात.

लखनऊ सायबर क्राइम एसपी त्रिवेणी सिंग, ज्यांनी सायबर क्राइम पोलिसांना सेवेचे बरेच वर्ष दिले आहेे त्या म्हणतात की, जर एखादा व्हिडिओ व्हायरल झाला की पिडीत व्यक्तीस अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांना वाटते की त्यांचा व्हिडिओ कायमस्वरूपी कोणत्या ना कोणत्या प्लॅटफॉर्मवर राहील. या प्रकरणाची भीती त्यांच्या मनात असते, परंतु प्रत्यक्षात याकडे सामान्य गुन्हा म्हणून पाहिले पाहिजे. आजकाल सायबर क्राईममध्ये आधुनिक तंत्रासह नवनवीन अपडेट्स येत आहेत. (Scam)

जर एखादा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असेल तर, पोलिस प्रथम त्यांच्या होस्ट वेबसाइटचा शोध घेण्यासाठी फॉरेन्सिक टूल्स वापरतात. सायबर युनिटला ते कोणत्या वेबसाइटने होस्ट केले आहे हे जाणून घेणे खूप सोपे आहे.

पोलिसही कारवाई करतात

कुठलेही फुटेज कोणत्या सोशल मीडिया नेटवर्कवर किंवा मायक्रो ब्लॉगिंगवर आहे, हे तपासले जाते. ती सामग्री ताबडतोब काढून टाकण्यासाठी त्यांना चिन्हांकित करून सूचित केले जाते. त्यांनी दिलेल्या मुदतीत ते न काढल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद आहे. (Social media)

सायबर प्रकरणातील जाणकार डेप्युटी एसपी विनोद सिंग सिरोही म्हणतात की, सायबर गुन्ह्यांच्या बाबतीत पोलिस शून्य सहनशीलतेची वृत्ती स्वीकारतात. पोलिसांचे पथक राष्ट्रीय स्तरावर एकमेकांच्या संपर्कात राहून सायबर प्रकरणांमध्ये एकत्र काम करतात, एवढेच नाही तर सायबर गुन्हे तज्ज्ञांची मदत घेऊन अनेक प्रकरणे सोडवली जातात.

लीक झालेले व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून काही वेळात काढून टाकले जाऊ शकतात, व्हिडिओ लीक झाल्या घाबरण्याची गरज नाही किंवा त्यांनी आत्महत्येसारखे कोणतेही पाऊल उचलू नये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT