Real or AI how to recognize viral fake videos in seconds

 

esakal

विज्ञान-तंत्र

AI Video Apps : AI ने बनवलेले व्हिडिओ नेमके ओळखायचे कसे? पाहा एका क्लिकवर

AI Photo Video Identify Tricks : आजकाल दारू पिणारा वाघ, पुण्यात फिरणारे बिबटे असे अनेक व्हिडिओ व्हायरल होतायत. पण ९०% हे AI ने बनवलेले खोटे असतात. पण हे ओळखायचं कसं जाणून घ्या

Saisimran Ghashi

AI Video Identifying Tools : गेल्या काही दिवसांत तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप किंवा इन्स्टाग्रामवर काही विचित्र व्हिडिओ आले का? झोपलेल्या माणसाला उचलून नेणारा वाघ, लखनौच्या रस्त्यावर फिरणारा बिबट्या, पुण्यात घरात शिरलेले बिबटे, किंवा रस्त्यावर बसलेला वाघ ज्याला एखादा माणूस दारू पाजतोय असा व्हिडिओ.. हे सगळे पाहून तुम्ही थक्क झालात, भीती वाटली किंवा लगेच फॉरवर्ड केलात का? थांबा.. हे सगळे व्हिडिओ खोटे आहेत. ते खरे कॅमेऱ्यात शूट केलेले नाहीत, तर AI ने तयार केलेले आहेत.

ai video

आजकाल सोशल मीडियावर AI तयार केलेले व्हिडिओ एवढे परफेक्ट दिसतात की सामान्य माणूस फसतो. गेल्या सहा महिन्यांत Sora, Kling, Luma सारख्या AI व्हिडिओ जनरेटर अ‍ॅप्समध्ये प्रचंड सुधारणा झाली आहे. आता फक्त एक वाक्य टाकले की १०-१५ सेकंदांचा एकदम खरा वाटणारा व्हिडिओ तयार होतो. त्यामुळे आता वाघ, बिबट्या, अस्वल, कुत्रा, ससे यांचे बनावट व्हिडिओ भरपूर फिरतायत.

ai video

AI व्हिडिओ नेमके ओळखायचे कसे?

१. क्वालिटी फारच वाईट असेल तर लगेच यावर विश्वास ठेऊ नका
आजच्या साध्या मोबाईलनेही रात्री 4K मध्ये स्पष्ट व्हिडिओ येतो. मग हा व्हिडिओ एवढा ब्लर, व्हिडिओ का? असा प्रश्न स्वतःला विचारा. बहुतेकदा AI व्हिडिओ कमी क्वालिटीचे असतात.

२. बनावट CCTV फूटेज
फसवणूक लपवण्यासाठी हे व्हिडिओ CCTV फूटेजच्या स्वरूपात दाखवले जातात. वर तारीख-वेळेच्या जागी फक्त आकडे लिहिलेले असतात. आवाजही नीट नसतो.

३. अतिशय चकचकीत आणि परफेक्ट दिसणं
उलट जर त्वचा फार तुकतुकीत, डोळे-नाक अगदी परफेक्ट, केस-कपडे अनैसर्गिक हलत असतील तरही AI असण्याची शक्यता जास्त. डोळ्यांच्या भावना, चेहऱ्याचे बारकावे अजूनही AI नीट करू शकत नाही.

ai video

४. हात-बोटं आणि फिजिक बघा
AI ला अजून पण हात-बोटं नीट करता येत नाहीत. एखादा उडी मारतोय, धावतोय तर सावली, प्रकाश, शरीराची रचना यात गडबड दिसते.

५. गायब होणारे किंवा बदलणारे डिटेल्स
ट्रॅम्पोलिनवर उड्या मारणाऱ्या सशांचा व्हिडिओ आठवतो का? ज्याचा फोटो सुद्धा आम्ही वर दिलेला आहे. या व्हिडिओत अचानक मध्येच एक ससा अचानक गायब होतो, दुसऱ्याचा आकार बदलतो. असे बारकवे लक्षात येतात.

६. फक्त ६-१० सेकंदांचे व्हिडिओ
जास्त लांब व्हिडिओ तयार करायला पैसे लागतात. म्हणजे सब्स्क्रिप्शन लागत म्हणून फ्री मध्ये बनवलेले बहुतेक व्हायरल AI क्लिप फक्त काही सेकंदांच्या असतात.

७. Sora चा वॉटरमार्क
OpenAI च्या Sora ने बनवलेल्या व्हिडिओवर “Sora” असा वॉटरमार्क येतो. तो काहीतर पॅच लावून झाकला असू शकतो किंवा त्या जागी ब्लर केलेल असत.

८. सर्वात महत्त्वाच म्हणजे खरंच असं होऊ शकतं का?
रस्त्यावर बसलेला वाघ आणि त्याला दारू पाजणारा माणूस.. खरच शक्य आहे का? हा प्रश्न विचारला की ९०% बनावट व्हिडिओ लगेच ओळखता येतात.

नागपूर पोलिसांनी तर दारू पिणाऱ्या वाघाच्या व्हिडिओमुळे अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीला नोटीसच बजावली. पुण्यातील बिबट्यांचे व्हिडिओही वनविभागाने बनावट घोषित केले. AI दिवसेंदिवस हुशार होतंय. उद्या हे व्हिडिओ आणखी खरे वाटतील. त्यामुळे आता आपल्यालाच सवय लावावी लागेल जो व्हिडिओ पाहाल तो फॉरवर्ड करण्याआधी काही सेकंद थांबा आम्ही वरती सांगितलेल्या गोष्टी तपासा आणि मग शेअर करा. नाहीतर तुम्हीच अनावधानाने खोटी, भीतीदायक अफवा पसरवत बसाल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: धनंजय मुंडेंच्या कार्यकर्त्याने जीवन संपवलं; धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, कारण काय?

Latest Marathi News Live Update : शरद पवार गटाचे जयंत पाटील यांचा राम खाडे कुटुंबियांना फोन; प्रकृतीची विचारपूस करून योग्य कारवाईची ग्वाही

Croma sale : क्रोमाच्या Black Friday Sale मध्ये 50% वाली डिस्काउंट ऑफर! कोणत्या वस्तू मिळतायत अर्ध्या किंमतीत? पाहा एका क्लिकवर

CM Devendra Fadnavis : लाडकी बहीण बंद न करता एक कोटी बहीणींना लखपती बनवणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Bigg Boss Marathi: 'पारु' मालिकेतील 'ही' अभिनेत्री बिग बॉस मराठीमध्ये दिसणार? एक पोस्टमुळे रंगली चर्चा

SCROLL FOR NEXT