विज्ञान-तंत्र

स्मार्टफोन हॅक झालाय की नाही, कसे ओळखाल? हॅक झाल्यास काय कराल?

विनायक होगाडे

या स्मार्टफोनच्या युगात आपली सगळीच कामे त्याच्याशिवाय होणे अशक्य होऊन बसले आहे. अगदी किती वाजले इथंपासून ते बँकेची देखील सगळी कामे आपण आपल्या स्मार्टफोनच्या माध्यमातूनच करु लागलो आहोत. स्मार्टफोनवर आपलं हे अवलंबून असणं वादातीत आहे. आपल्याला सध्या दोनच गोष्टींची चिंता असते. एक म्हणजे मोबाईलमधला महत्त्वाचा हा डेटा उडून जाऊ नये आणि दुसरी म्हणजे आपला स्मार्टफोनच हरवू नये. मात्र, हॅकर्स आपल्या या खासगी डेटावर बारीक लक्ष ठेवून असू शकतात. सध्या सुरु असलेल्या पेगॅसिस स्पायवेअरचं एकूण प्रकरण तुम्ही ऐकलंच असेल. त्या पार्श्वभूमीवर तुम्हालाही तुमचा फोन हॅक होण्याची चिंता वाटतेय का? तुमचा स्मार्टफोन हॅक झालाय किंवा नाही, हे कसं ओळखाल? याविषयीच आपण आज माहिती घेणार आहोत. (How to identify your smartphone is hacked and how to get rid of it)

स्मार्टफोनची बॅटरी पटकन उतरणे:

जर तुमचा फोन हॅक केला गेला असेल, तर दोन गोष्टी शक्य आहेत. एक म्हणजे हॅकर तुमच्या प्रत्येक डीजीटल कृतीवर लांबून लक्ष ठेवून आहे अथवा तो तुमच्या स्मार्टफोनशी निगडीत डेटा चोरुन घेत आहे. या सगळ्या प्रक्रियेमुळे तुमच्या मोबाईलचे मालवेअर बॅकग्राऊंडला सुरु राहू शकते. ज्यामुळे प्रोसेसर, मेमरी सुरु राहून तुमची बॅटरी लवकर उतरु शकते.

वाढलेला डेटा युझेस: तुमचा फोन हॅक झालाय की नाही, हे ओळखण्याचा आणखी एक उपाय म्हणजे तुमच्या मोबाईलच्या डेटा युझेसमध्ये वाढ झालेली असू शकते. जरी तुम्ही फार डेटा वापरत नसला तरीही अनपेक्षितपणे हा डेटा युझेस वाढलेला असू शकतो.

अननोन टेक्स्ट मॅसेज आणि कॉल्स: तुमच्या स्मार्टफोनवर येणारे टेक्स्ट मॅसेज आणि कॉल्सवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तुमच्या मोबाईलवरुन तुमच्याही नकळत टेक्स्ट मॅसेज आणि कॉल्स केले जात असतील, तर ही मोबाईल हॅक झाला असण्याच्या धोक्याची घंटा आहे.

अयोग्य पॉप-अप्स: तुमच्या मोबाईलवर जर एकदमच ब्राईट, फ्लॅशिंग ऍड्स किंवा एक्स-रेटेड कंटेट जर पॉप-अप होऊन स्क्रीनवर येत असेल, तर तुमच्या मोबाईलवर मालवेअर अटॅक झालाय असं समजा. तुम्ही एखाद्या मॅसेजमधील अथवा वेब ब्राऊजरमधील चुकीच्या लिंकवर क्लिक केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

माहित नसलेले ऍप्स: तुमच्या मोबाईलवर जे ऍप्स तुम्ही डाऊनलोड करता त्याबद्दल सजग रहा. जर तुमच्या मोबाईलमध्ये तुम्ही कधीच स्वत:हून इन्स्टॉल न केलेले ऍप आले असेल, तर समजून जा की तुमच्या स्मार्टफोनवर मालवेअर अटॅक झाला आहे.

पण तुमचा मोबाईल हॅक होतो तरी कसा?

हॅक होण्यासाठी सगळ्यात मोठी चूक ठरते ती तुमचीच! तुम्ही जाणीवपूर्वक असो वा नजरचुकीने अथवा अजाणतेपणी एखाद्या चुकीच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर मोबाईल हॅक होण्याचा अधिक चान्स आहे. अशा चुकीच्या लिंक्स एकतर तुम्हाला आकर्षक पद्धतीने टेक्स्ट मॅसेज, इमेल्स अथवा ऍप्समधून पाठवल्या जाऊ शकतात.

मोबाईल हॅक झाला तर करायचं तरी काय?

जर तुमचा मोबाईल हॅक झालाय, असा संशय तुम्हाला आला असेल, तर सर्वांत आधी नको असलेले ऍप्स आणि ज्या डेटाबद्दल तुम्हाला संशय आहे, असा डेटा डिलीट करा. एखादं चांगलं अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर डाऊनलोड करणं केंव्हाही चांगलं. शेवटचा पर्याय म्हणजे तुमचा हँडसेट रिसेट मारणे, जेणेकरुन अजाणतेपणी आलेले मालवेअर डिलीट होतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT