Jio 5G Sakal
विज्ञान-तंत्र

Jio 5G: जिओ यूजर्सला मिळणार सुपरफास्ट इंटरनेटचा फायदा, ५जी साठी करा फक्त 'एवढ्या' किंमतीचा रिचार्ज

देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या जिओने देशातील प्रमुख शहरांमध्ये ५जी सर्व्हिस लाँच केली आहे. तुमच्याकडे ५जी फोन असल्यास तुम्ही देखील फास्ट इंटरनेटचा वापर करू शकता.

सकाळ डिजिटल टीम

Jio 5G Welcome Offer: देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या Reliance Jio ने ५जी सर्व्हिस लाँच केली आहे. यामुळे देशातील अनेक शहरांमध्ये ५जी सर्व्हिसचा उपलब्ध होणार आहे. तुम्ही देखील जिओचे यूजर्स असाल तर कंपनीच्या Jio 5G Welcome Offer चा फायदा घेऊ शकता. कंपनीने सध्या दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, वाराणसी, चेन्नई, बंगळुरू, हैद्राबाद, पुणे या शहरांमध्ये ५जी सेवा सुरू केली आहे. डिसेंबर २०२३ पर्यंत संपूर्ण भारतात ५जी उपलब्ध करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे.

तुम्ही देखील ५जी सेवा उपलब्ध असलेल्या भागात राहत असाल तर या सर्व्हिसचा सहज फायदा घेऊ शकता. तुम्हाला जर Jio Welcome Offer साठी साइन अप कसे करायचे माहित नसल्यास काळजी करू नका. याची संपूर्ण प्रोसेस जाणून घेऊया.

हेही वाचा : प्राप्तिकर- कशाने मिळेल सूट, कशावर भरावा लागेल कर....

तुम्ही जर ५जी उपलब्ध असलेल्या भागात राहत असाल व तुमच्याकडे ५जी स्मार्टफोन असल्यास केवळ MyJio app डाउनलोड करावे लागेल. तुम्ही गुगल प्ले स्टोरवरून या अ‍ॅपला डाउनलोड करू शकता. अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला स्क्रीनवर ५जी सर्व्हिसबाबत मेसेज दिसेल. तुम्हाला स्क्रीनवर दिसणारी प्रोसेस फॉलो करून ५जी साठी साइन अप करावे लागेल.

कंपनी देखील Jio 5G Welcome Offer चा फायदा घेण्यासाठी यूजर्सला मेसेज करत आहे. तुम्हाला जर ५जी साठी मेसेज आला नसल्यास काहीदिवस वाट पाहू शकतो अथवा MyJio app मध्ये जाऊन Jio 5G उपलब्ध आहे की नाही, हे पाहता येईल. तसेच, जिओने स्पष्ट केले आहे की यूजर्सला ५जी वापरण्यासाठी २३९ रुपयांच्या पुढील रिचार्ज करावे लागतील.

तुम्ही फोनच्या सेटिंग्समध्ये काही बदल करून ५जी चा लाभ घेऊ शकता. यासाटी तुम्हाला सर्वात प्रथम सेटिंग्समध्ये जावे लागेल. त्यानंतर Network and Internet वर क्लिक करा. त्यानंतर SIMs वर जाऊन Preferred Network Type निवडा. यानंतर तुमच्या भागात ५जी असल्यास तुम्ही फास्ट इंटरनेटचा फायदा घेऊ शकता.

दरम्यान, आता भारतातील iPhone यूजर्सला देखील ५जी सर्व्हिस वापरता येणार आहे. यासाठी कंपनीने iOS 16.2 अपडेट जारी केले आहे. तुम्ही आयफोन १२ च्या पुढील सर्व मॉडेलमध्ये ५जी वापरू शकता.

हेही वाचा: टेक्नोहंट : ‘अवतार’ची अफलातून दुनिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT