G pay
G pay sakal
विज्ञान-तंत्र

Digital Payment: फोन हरवला तर PhonePe, GPay आणि Paytm कसं ब्लॉक करणार?

सकाळ डिजिटल टीम

आजकाल कोणीही नोटा, चिल्लर खिशात बाळगत नाहीत. म्हणजे अगदी पानाच्या टपरीपासून ते वाणसामानाचं दुकान असो, चहाची टपरी असो, मोठमोठे मॉल्स असो लोक ऑनलाइन पेमेंटला प्राधान्य देतात. कोरोनानंतर तर जगभरात डिजिटल पेमेंटचा ट्रेंड वाढला.

RBI च्या मासिक आकडेवारीनुसार, या वर्षीच्या एप्रिल महिन्यात युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस म्हणजे यूपीआयमार्फत जे व्यवहार होतात त्यात 9.83 लाख कोटी रुपये इतकी वाढ झालीय. ऑगस्टमध्ये तर हा आकडा 10.73 लाख कोटी रुपयांपर्यंत गेलाय. (if your phone lost then how can you block phone pay google pay and paytm read story)

हे ही वाचा - राष्ट्र तरेल कसे? धर्मकारणातून की धर्मनिरपेक्षतेतून?

लोक एकापेक्षा जास्त UPI पेमेंट अॅप्लिकेशन वापरतात. यामुळे आपलं आयुष्य सोपं झालं असलं तरी याचे काही तोटे पण आहेत. हे अप्लिकेशन आपल्या फोनमध्ये असतात त्यामुळे आपला फोन हरवला तर मग मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतं. कारण बऱ्याचदा याचा गैरवापर होण्याची शक्यता असते.

मग अशा अडीअडचणीच्या काळात काहीही करून अकाऊंट ब्लॉक करणं आपल्याला क्रमप्राप्त ठरतं. पण मोबाईल नसताना सुद्धा तुम्ही हे PhonePe, Google Pay, Paytm अप्लिकेशन्स ब्लॉक करू शकता.

PhonePe चं अकाउंट ब्लॉक करण्यासाठी 08068727374 या हेल्पलाइन वर कॉल करा.

त्यानंतर तुम्हाला काही ऑप्शन्स दिले जातील. त्यातून स्टेप बाय स्टेप निवड करा.

1. नोंदणीकृत मोबाईल क्रमांक

2. PhonePe वर नोंदणीकृत ईमेल आयडी

3. प्रकार, किंमत इ. सारखे अंतिम देयक तपशील.

4. लिंक केलेल्या बँक खात्यांची नावं

5. पर्यायी मोबाईल क्रमांक असल्यास

6. तुमचे अकाऊंट तात्पुरत्या स्वरूपात ब्लॉक केलं जाईल.

पेटीएम पेमेंट्स बँक हेल्पलाइनसाठी 0120 4456456 वर कॉल करा.

1. 'रिपोर्ट लॉस किंवा वॉलेट, डेबिट कार्ड किंवा बचत खात्याचा अनधिकृत वापर' हा ऑप्शन निवडा.

2. 'लॉस्ट फोन' हा ऑप्शन निवडा

3. हरवलेल्या फोनचा मोबाईल नंबर टाका

4. 'ब्लॉक पेटीएम अकाऊंट' हा ऑप्शन निवडा

Google Pay ब्लॉक करण्यासाठी 1800-419-0157 या टोल-फ्री हेल्पलाइन नंबरवर कॉल करा. एखाद्या तज्ञाशी बोलण्याचा ऑप्शन निवडा आणि तुमचं अकाऊंट ब्लॉक करण्यासाठीची सर्व माहिती द्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: गुंतवणूकदार चिंतेत! शेअर बाजारात पुन्हा घसरण; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत राहतो'; कराराच्या आधारे कोर्टाने केली आरोपीची सुटका

MS Dhoni: 'थाला'ने गुंतवणूक केलेल्या कंपनीचा मेगा प्लॅन; पुण्यात उभारणार देशातील सर्वात मोठी फॅक्टरी

Vladimir Putin: 'आम्ही चर्चेस तयार पण...', पाचव्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच पुतिन यांची पाश्चिमात्य देशांना साद

Akshaya Tritiya 2024 : सोन्याचा झुमका, हिऱ्याची अंगठी अन् बरंच काही..! अक्षय तृतीयेला पत्नीला गिफ्ट करा 'हे' दागिने

SCROLL FOR NEXT