IRCTC Support Guide
IRCTC Support Guide esakal
विज्ञान-तंत्र

IRCTC Support Guide : एखाद्याने तुमची रेल्वेची रिझर्व्ह सीट बळकावलीय? ; भांडू नका, या टिप्स वाचा!

Pooja Karande-Kadam

IRCTC Support Guide : लोकल ट्रेन असो वा बुलेट ट्रेन रेल्वेत बसायच्या जागेसाठी भांडणं तर होतातच. बिचारे लोकलने प्रवास करणारे नोरकदार तर उभ राहण्याच्या जागेसाठी भांडतात. आजचीच गोष्ट. सकाळीच एक बातमी वाचली, रेल्वेत जागेसाठी झालेल्या भांडणावरून दोन महिलांच्यात बाचाबाची झाली.

हा वाद इतका टोकाला पोहोचला की, यातील एका महिलेने पर्समधील पेपर स्प्रेची बाटली काढली. अन् थेट समोरच्या महिलेच्या तोंडावर फवारणी केली. या घटनेचे फोटोही व्हायरल झाले.

तूम्हीही कधीतरी रेल्वेच्या सीटवरून भांडला असाल. तर इथून पुढे असं भांडत बसू नका. तूमची गेलेली सीट कशी परत मिळवायची. याच्या काही टिप्स आज आपण पाहुयात.

बरेच लोक लांबच्या प्रवासासाठी महिने आधीच आरक्षण करतात. तुम्ही ट्रेनमध्ये चढता तेव्हा तुमची सीट कोणीतरी व्यापलेला असू शकतो. विशेषतः जर तुमचा प्रवास कोणत्याही मधल्या स्टेशनवरून सुरू झाला असेल.

तुमच्या सीटवर बसलेली व्यक्ती उठण्यास नकार देते. अशा परिस्थितीत, तुमचा बर्थचा ताबा मिळवण्यासाठी तुम्ही काय करावे. तुमच्यासोबतही असे काही घडल्यास तुम्ही Rail Madad अॅपची मदत घेऊ शकता. याबाबत तुम्ही Rail Madad अॅप डाउनलोड करून तक्रार करू शकता.

दुसऱ्याने सीट घेतलीय?

तुमची बुक केलेली सीट दुसर्‍याने घेतली. तर त्यांच्याशी प्रेमाने बोलून बघा. तो व्यक्ती भांडणावर उतरला तर तुम्ही रेल्वेकडे तक्रार करून तुमची सीट रिकामी करू शकता. Dail 139 वर तक्रार करा.

TTE ला कळवा

रेल्वेचे अधिकारी सांगतात की, एखाद्या प्रवाशाच्या आरक्षित सीटवर दुसरा व्यक्ती ठाण मांडून बसला असेल. तर, सर्वात आधी तूम्ही ट्रेनच्या TTE ला कळवा.  जर तुम्ही ऑनलाइन तक्रार नोंदवू शकत नसाल तर तुम्ही रेल्वे हेल्पलाइन क्रमांक 139 वरही तक्रार नोंदवू शकता.

'रेल्वे मदत'वर तक्रार करा

अशा प्रकारची प्रकरणे रेल्वेला काही नवी नाहीत. रेल्वेच्या सेकंड क्लास आणि स्लीपर ते एसी क्लासमध्ये इतरांच्या सीटवर प्रवासी बसलेले आढळतात. जर तुमच्यासोबतही असे घडले असेल. तुमच्या आजूबाजूला कोणी TTE नसेल तर तुम्ही 'रेल्वे मदत' वर तक्रार करू शकता. अनधिकृत प्रवाशाबाबत तक्रार करून सीट रिकामी करण्यासाठी तुम्हाला रेल्वे मदतच्या वेबसाईटवर जावे लागेल.

अशी करा तक्रार

  • तुम्ही प्रथम https://railmadad.indianrailways.gov.in वर क्लिक करा.

  • तुम्हाला मोबाईल नंबर टाकून Send OTP वर क्लिक करावे लागेल.

  • आता तुमच्या मोबाईलवर मिळालेला OTP टाका.

  • तुमच्या तिकीट बुकिंगचा PNR क्रमांक टाका.

  • आता सिलेक्ट टाईप करा. त्यावर क्लिक करून तुमची तक्रार करा.

  • घटनेची तारीख निवडा.

  • आता तुमची तक्रार तपशीलवार लिहा.

  • त्यानंतर सबमिट वर क्लिक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Soan Papdi: बाबा रामदेव यांना आणखी एक धक्का! पतंजलीची सोनपापडी निकृष्ट, तिघांना तुरुंगवास

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

SCROLL FOR NEXT