Infinix Zero Ultra 5G  Sakal
विज्ञान-तंत्र

Smartphone Offer: 200MP कॅमेरा, 180W चार्जिंगसह येणाऱ्या फोनला 10 हजारांच्या बजेटमध्ये करा खरेदी; पाहा भन्नाट ऑफर

काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या Infinix Zero Ultra 5G स्मार्टफोनची आजपासून विक्री सुरू झाली आहे. फोनमध्ये २०० मेगापिक्सलचा कॅमेरा मिळेल.

सकाळ डिजिटल टीम

Infinix Zero Ultra 5G First Sale: इनफिनिक्सने काही दिवसांपूर्वीच Zero Ultra 5G स्मार्टफोनला भारतात लाँच केले आहे. हा फोन आजपासून विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. या फोनच्या ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची मूळ किंमत ४९,९९९ रुपये आहे. परंतु, फ्लिपकार्टवर ४० टक्के डिस्काउंटनंतर फक्त २९,९९९ रुपयात खरेदी करू शकता. कॅशबॅक, बँक ऑफर्स आणि एक्सचेंज ऑफर्सचा फायदा मिळाल्यास हँडसेटला १० हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. फोन Coslight Silver आणि Genesis Noir रंगात उपलब्ध आहे.

Infinix Zero Ultra 5G वर मिळेल बंपर डिस्काउंट

इनफिनिक्सच्या या फोनच्या ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला ४० टक्के डिस्काउंटनंतर २९,९९९ रुपयात खरेदी करू शकता. फोन खरेदी करताना बँक ऑफ बडोदा आणि फेडरल बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास १० टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळेल.

फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक कार्डचा वापर केल्यास ५ टक्के कॅशबॅक मिळेल. एवढेच नाही तर यावर १७,५०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. सर्व ऑफरचा फायदा मिळाल्यास फोनला १० हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करता येईल.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

Infinix Zero Ultra 5G चे स्पेसिफिकेशन्स

Infinix Zero Ultra 5G फोनमध्ये ६.८ इंच एचडी प्लस ३डी कर्व्ड एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज, पीक ब्राइटनेस १०० निट्स आहे. यात ६एनएम ऑक्टाकोर मीडियाटेक डायमेंसिटी ९२० प्रोसेसरसह ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळते. रॅमला १३ जीबीपर्यंत वाढवू शकता. तसेच, मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने स्टोरेजला २ टीबीपर्यंत वाढवता येईल.

फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यात २०० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा दिला असून, हा ऑप्टिकल इमेज स्टेबलाइजेशन सपोर्टसह येतो. याशिवाय, १३ मेगापिक्सल + २ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. यात १८० वॉट थंडर फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल. कंपनीचा दावा आहे की फोनला अवघ्या १२ मिनिटात फुल चार्ज करू शकता.

हेही वाचा: Mobile Recharge: आता वर्षाला फक्त एकदाच करा रिचार्ज! Airtel च्या 'या' प्लॅनमध्ये मिळेल अनलिमिटेड कॉलिंग-डेटाचा फायदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Giorgia Meloni wishes PM Modi: मोदींना इटलीच्या पंतप्रधान मेलोनींकडून 'सेल्फी'वाल्या मेसेजद्वारे खास शुभेच्छा, म्हणाल्या...

Asia Cup 2025: पाकिस्तान संघाचा UAE विरूद्धच्या सामन्यावर बहिष्कार? खेळाडूंना हॉटेलमध्येच थांबण्याचे आदेश; जाणून घ्या प्रकरण

Latest Marathi News Updates : पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती टोमॅटोच्या भावात घसरण

Jalgaon News : जळगाव विमानसेवा ठप्प: अहमदाबाद विमान दीड महिन्यापासून बंद, प्रवाशांची गैरसोय!

Facial Surgery Success Story: "सुसाईड डिसीज"वर यशस्वी शस्त्रक्रिया - ठाण्यात दोन रुग्णांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

SCROLL FOR NEXT