iPhone 15 Pro esakal
विज्ञान-तंत्र

iPhone 15 Pro : ग्राहकांच्या तक्रारी! फोन गरम होण्याबाबत Apple ने दिलं स्पष्टीकरण

या समस्येवर खुद्द Apple कंपनीनेच अधिकृतरित्या स्पष्टीकरण दिले आहे.

साक्षी राऊत

iPhone 15 Pro : सप्टेंबर २२ पासून iPhone 15 Pro सीरीज लाँच झाल्यापासून यूजर्सना आणि रिव्ह्यूवर्सच्या हा फोन गरम होण्याच्या तक्रारी होत्या. विशेषत: प्रो मध्ये या समस्या जास्त प्रमाणात आढळून आल्या होत्या. आता या समस्येवर खुद्द Apple कंपनीनेच अधिकृतरित्या स्पष्टीकरण दिले आहे.

“आम्ही काही कंडिशन्सवर आयफोन अपेक्षेपेक्षा जास्त गरम होऊ शकतो हे ओळखले आहे. डिव्हाइस सेट केल्यानंतर किंवा रिस्टोअर केल्यानंतर त्याच्या वापरात पहिल्या काही दिवसांमध्ये डिव्हाइस गरम जाणवू शकते.” असे Apple ने म्हटले आहे.

Apple पुढे म्हणाले, “आम्हाला iOS 17 मध्ये एक बग देखील सापडला आहे ज्याचा प्रभाव काही यूजर्सच्या मोबाईलवर दिसून येतो. या समस्येचे निराकरण सॉफ्टवेअर अपडेट्समध्ये केल्या जाईल.

थर्ड पार्टी अॅप्सच्या काही रिसेंट अपडेट्समुळे ते सिस्टम ओव्हरलोड करत आहेत. त्यामुळे या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आम्ही या अॅप डेव्हलपर्ससोबत रोल आउट प्रक्रियेसंदर्भातही बोलतोय.”

Apple ने काही अहवालांद्वारे प्रसारित केलेल्या काही गैरसमजांचे स्पष्टीकरण देखील दिले आहे:

Apple म्हणते की सबस्ट्रक्चर मटेरियल म्हणून टायटॅनियमवर स्विच करून आयफोन 15 प्रो जास्त गरम होत नाही शिवाय मागील स्टेनलेस स्टील मॉडेलपेक्षा रिसेंट मॉडेल चांगले आहे.

Instagram, Asphalt 9 आणि Uber सह असे काही अॅप्स आहेत, जे CPU ला “ओव्हरलोड” करत आहेत, ज्यामुळे फोन सामान्यपेक्षा जास्त गरम होतो.

Apple ने असेही म्हटले आहे की, बग फिक्स करणारी अपकमिंग IOS सिस्टिम डिव्हाइल थंड करण्यासाठी कार्यशील नाही.

20W पेक्षा जास्त वॅटचे समर्थन करणारे हायर अॅडॉप्टर वापरण्याबाबत Apple सांगतं की, यूजर्सने फास्ट चार्जिंग करताना iPhoneचे तापमान तात्पुरते वाढेल.

"आयफोन अजूनही 27W पर्यंत डिव्हाइसमध्ये पॉवर नियंत्रित करतो जोपर्यंत अॅडॉप्टर यूएसबी-सी पीडी (पॉवर डिलिव्हरी) स्टँडर्डशी सुसंगत आहे, तेव्हा फोनच्या सगळ्या गोष्टी सुरळीत असणे अपेक्षित आहे असे अॅप्पलचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT