know how to deactivate your account from Truecaller  
विज्ञान-तंत्र

TrueCaller वरून अकाउंट डीॲक्टिव्हेट करायचंय? मग आताच फॉलो करा या स्टेप्स

सकाळ डिजिटल टीम

नागपूर :  आपल्याला येणारे अपरिचित कॉल्स  कोणाचे आहेत आणि कुठून येत आहेत हे जाणून घेण्यासाठी आपण TrueCaller चा वापर करतो. कुठलाही कॉल नक्की कोणाचा आहे तसंच तो Spam तर नाही ना हे माहिती करून घेण्यासाठी TrueCaller ची मदत आपण घेतो. मात्र अनेकदा TrueCaller वरून आपली काही माहिती लीक होण्याची भीती असते. TrueCaller डाउनलोड केल्यानंतर तुम्ही तुमचा नंबर, नाव या सर्व गोष्टी रजिस्टर करता आणि यामुळे तुमची माहिती TrueCaller कडे जाऊ शकते. मात्र आता चिंता करू नका. तुमचं अकाउंट डीॲक्टिव्हेट कसं करायचं? हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

TrueCaller असं करतं काम 

तुमच्या मोबाईलमध्ये TrueCaller  डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अकाउंट तयार करण्यासाठी तुमचं नाव, मोबाईल नंबर विचारण्यात येतो. ही माहिती भरल्यानंतर तुमचं अकाउंट TrueCaller  वर रजिस्टर होतं. मात्र यानंतर तुम्हाला तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टचा ॲक्सेस मागण्यात येतो ज्यामुळे TrueCaller तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह असलेल्या सर्व कॉन्टॅक्टची माहिती मिळू शकतो. यामध्ये काही प्रमाणात तुमचा मोबाईल हॅक होण्याचीही भीती असते. तसंच तुमची सगळी माहिती TrueCaller कडे जाते. म्हणूनच हे अकाउंट डीॲक्टिव्हेट करण्याची अनेकांची इच्छा असते. 

अशा पद्धतीनं करा TrueCaller डीॲक्टिव्हेट :

अँड्रॉइड यूजर्ससाठी 

सुरुवातीला तुमच्या मोबाईलवर TrueCaller ही अप्लिकेशन ओपन करा. 
यानंतर वरती असलेल्या ३ लहान रेषांवर क्लिक करा. 
TrueCaller मध्ये सेटिंग ओपन करा. 
सेटिंगमध्ये जाऊन privacy centre मध्ये जा. 
यानंतर अकाउंट डीॲक्टिव्हेट च्या पर्ययावर क्लिक करा. 
यानंतर कन्फर्म करा. 

आयफोन यूजर्ससाठी 

आयफोनमध्ये TrueCaller ओपन करा. 
यानंतर वरती असलेल्या प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा. 
यानंतर सेटिंग्समध्ये जा. 
यानंतर प्रायव्हसीमध्ये जा. 
यानंतर तुम्हाला तुमचं अकाउंट डीॲक्टिव्हेट करता येईल.  

अशा पद्धतीनं मिटवा तुमचा फोन नंबर 

यानंतर Truecaller च्या ऑफिशिअल अनलिस्ट पेजवर जा. 
यानंतर तुम्हाला डीलीस्टिंग करण्यासाठी विनंती करावी लागेल. 
यानंतर तुमच्या देशाच्या कोडसोबत तुमचा नंबर रजिस्टर करा. 
यानंतर तुम्हाला केपचा टाईप करावा लागेल. 
यानंतर अनलिस्ट फोन नंबरवर क्लिक करा. 
स्लाईड आऊट पेनमध्ये अनलिस्टवर क्लिक करा. 
यानंतर तुमच्या नंबरवर मसेज येईल. यानंतर तुमचा फोन नंबर निघून जाईल. 

संकलन आणि संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Audio Clip: उद्घाटनाच्या कार्यक्रमाला 70 हजार रुपये; हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाचा रेट फिक्स! ऑडिओ क्लिप व्हायरल

हृदयद्रावक! ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या संघातील फुटबॉलपटू Diogo Jota चा कार अपघातात मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Thackeray Rally: मुंबईत ५ जुलैला ठाकरे बंधूंची संयुक्त रॅली, तयारीसाठी बैठकांचा सपाटा, पण अजून पोलिसांची परवानगी नाही

Nashik Police Transfers : नाशिक पोलिस उपायुक्तांच्या बदल्या; नवीन नियुक्तीला उशीर का?

‘गुलाबी साडी’ फेम संजू राठोडची मराठी गाणी बॉलिवूडमध्ये झळकणार....

SCROLL FOR NEXT