विज्ञान-तंत्र

Good News! भारतात सर्वात मोठे Electric Vehicle चार्जिंग स्टेशन सुरू

एका दिवसात चार्ज होणार ५७६ गाड्या

सकाळ डिजिटल टीम

Largest EV Charging Station in India : तुमच्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. आज(शुक्रवारी ता.२०) भारताचे सर्वात मोठे इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन सुरु झाले आहे. हे चार्जिंग स्टेशन दिल्ली-जयपूर नॅशनल हायवेवर गुरुग्राम सेक्टर ५२ मध्ये येथे आहे. हा सर्वात मोठा चार्जिंग प्लांट आहे जिथे एकाच वेळा १०० गाड्या चार्ज होऊ शकतात. त्याची कॅपसिटी इतकी आहे की पूर्ण दिवसामध्ये ५७६ गाड्या चार्ज होऊ शकतात. नवीन चार्जिंग स्टेशनमध्ये १०० पेक्षा जास्त चार्जिंग प्लांईट्स आहेत ज्याद्वारे चारचाकी गाड्यांचा एकाच वेळी चार्ज करता येतील. या पूर्वी नवी मुंबईमध्ये १६ एसी आणि ४ डीसी चार्जर असलेले स्टेशन सर्वात मोठे मानले जात होते पण आता तो मान नव्या चार्जिंग स्टेशनला मिळणार आहे.

इतका मोठा पहिलाच चार्जिंग स्टेशन

इज ऑफ डूइंग बिजनेस कार्यक्रमामध्ये भारताच्या सर्वात चार्जिंग स्टेशनची सुरूवात ई-हायवेच्या टेक्निकल पायलट नेशनल हायवे फॉर इलेक्ट्रिक व्हेइकल (NHEV)अंतर्गत गुरग्रामने सेक्टर ५२ मध्ये इलेक्ट्र्रिफाय हबमध्ये झाली.जानेवारी 2022 मध्ये ऊर्जा मंत्रालयाने जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वे आणि मानकांची पूर्तता करणारे हे पहिले मोठे चार्जिंग स्टेशन असेल.

हे स्टेशन फक्त इलेक्ट्रिक फक्त व्हेईकल्स इंडस्ट्रीसाठी, उलट देशात भविष्यात बनवण्यात येणाऱ्या स्टेशन्ससाठी देखील एक स्टँडर्ड ठरू शकते. उद्घाटनाच्या निमित्त आयोग आणि विविध सरकारी संस्थांमधून आलेल्या पाहूण्यांना एनएचव्ही कार्यक्रम संचालक अभिजित सिन्हाने तांत्रिक क्षमता आणि सेफ्टी स्टँडर्डची माहिती दिली.

'इज ऑफ डुईंग' बिजनेसचे उदाहरण

कार्यक्रमादरम्यान इज ऑफ डुइंग बिझनेस कार्यक्रम संचालक आणि एन.एच.ई.व्ही. प्रकल्प संचालक अभिजीत सिन्हा म्हणाले की, ''भारत पेट्रोलियम वाहतूक महसुलापेक्षा इलेक्ट्रिक ट्रॅफिक इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन्फ्रा गुंतवणुकीला प्राधान्य देण्याच्या टप्प्यावर पोहोचणार आहे. ते म्हणाले की, आतापर्यंत देशात एवढी मोठी आणि विस्तृत चार्जिंग स्टेशन्स बांधली गेली नाहीत आणि ही स्टेशन्स प्रमाणन अनुपालन आणि सुरक्षा निर्देश मानकामध्ये आज उद्योगासाठी व्यवसाय सुलभतेचे उदाहरण आहेत

एका दिवसात 576 वाहने चार्ज होणार

NHEV वर्किंग ग्रुपचे सदस्य आणि इलेक्ट्रीफाय स्टेशनचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण कुमार म्हणाले की, स्टेशनमध्ये सध्या 96 चार्जर आहेत आणि स्टेशन एका वेळी 96 इलेक्ट्रिक कार चार्ज करू शकते आणि संपूर्ण दिवसात 576 वाहने चार्ज करू शकते. एक एसी चार्जर 6 तासात कार पूर्णपणे चार्ज करतो आणि दिवसात अशी 4 वाहने चार्ज करतो. आमच्याकडे असे 72 चार्जर आहेत, जे एका दिवसात 288 नॉन-स्टॉप वाहने चार्ज करू शकतात. DC फास्ट चार्जर 2 तासांपेक्षा कमी वेळेत आरामात कार चार्ज करू शकतो आणि दिवसभरात 12 आणि 24 चार्जर आहेत, जे 1 दिवसात 288 इलेक्ट्रिक कार पटकन चार्ज करू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

State Government : मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका; निवडणूक आचारसंहितेपूर्वी घेतले २१ निर्णय

Maharashtra Governance : कायद्याबाहेरील कलमांवर दिला हद्दपारीचा आदेश; विभागीय आयुक्तांनी उपजिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय केला रद्द!

Sakal Karandak : पुणे विभागातून ‘बीएमसीसी’ महाअंतिम फेरीत सकाळ करंडक; विभागीय अंतिम फेरीचा समारोप

PMC elections : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीच्या वेळापत्रकात बदल; ६ ऐवजी १४ नोव्हेंबरला प्रारुप मतदार यादी जाहीर होणार!

ODI Record: भारतीय वंशाच्या क्रिकेटरचा अमेरिकेसाठी पराक्रम; विराटलाही मागे टाकत वनडेमध्ये रचला विश्वविक्रम

SCROLL FOR NEXT