Indian Railway Seat Forecast Feature  esakal
विज्ञान-तंत्र

Seat Forecast Feature : रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग तिकीटचा त्रास संपला; आता 'हे' अ‍ॅप सांगणार तिकीट कधी संपणार..

Indian Railway Seat Forecast Feature : मेकमायट्रिपने 'सीट अव्हेलेबिलिटी फोरकास्ट' ही नवी सुविधा सुरू केली आहे. ही सुविधा तिकीट किती दिवसात संपेल याचा अंदाज देऊन प्रवाशांना निर्णय घेण्यात मदत करणार आहे.

Saisimran Ghashi

Indian Railway Seat Forecast Feature : भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध ट्रॅव्हल बुकिंग प्लॅटफॉर्म MakeMyTrip ने आपल्या अ‍ॅप आणि वेबसाईटवर एक नवीन फीचसर सुरू केले आहे, जे रेल्वे तिकिटांच्या उपलब्धतेचा अंदाज लावून प्रवाशांना वेळेत निर्णय घेण्यास मदत करणार आहे.

या सुविधेचं नाव आहे Seat Availability Forecast म्हणजेच तिकीट किती दिवसांत संपेल याचा अंदाज. अनेक वेळा प्रवासी आपल्या प्रवासाचं नियोजन करत असताना तिकीट मिळेल की नाही याबाबत अनिश्चित असतात. त्यामुळे बऱ्याचदा लोक वेटिंग लिस्टवर राहतात. MakeMyTrip च्या आकडेवारीनुसार, सुमारे ४० टक्के प्रवासी आपले तिकीट बुक करताना अनेक वेळा अ‍ॅपवर ये-जा करत असतात आणि त्यातील ७० टक्के प्रवाशांना शेवटी वेटिंग तिकिटांवर समाधान मानावं लागतं.

भारतात आरक्षित तिकिटं प्रवासाच्या ६० दिवस आधीपासून बुक करता येतात, पण प्रत्यक्षात अनेक प्रवासी प्रवासाच्या अगदी काही दिवस आधीच आपली योजना निश्चित करतात. त्यामुळे मागणीच्या तीव्रतेमुळे अनेकदा तिकीट पटकन संपतात. उदा. एप्रिल महिन्यात काही सुपरफास्ट ट्रेनचे तिकिटं १३ दिवस आधीच संपत होती, पण मे महिन्यात ही मागणी इतकी वाढली की तीच तिकिटं २० दिवस आधीच फुल झाली होती.

यामुळे प्रवाशांना तिकिटं किती दिवसांपर्यंत उपलब्ध असतील याचा अंदाज घेणं अवघड जातं. ही अडचण लक्षात घेऊन MakeMyTrip ने ही नविन सुविधा आणली आहे.

ही सुविधा कशी काम करते?

Seat Availability Forecast हे फिचर डेटा सायन्सच्या आधारे काम करतं. ट्रेन बुकिंग करताना हे फिचर वापरकर्त्यांना सुचवतं की तिकीट किती वेळात संपण्याची शक्यता आहे. ही सुविधा आता MakeMyTrip च्या अ‍ॅप आणि वेबसाईटवर उपलब्ध आहे.

MakeMyTrip चे सह-संस्थापक आणि ग्रुप CEO राजेश मॅगो यांनी सांगितले की, “भारतीय रेल्वे प्रवाशांच्या गरजा ओळखून आम्ही ही सुविधा आणली आहे. तिकीट मिळेल की नाही या चिंतेतून प्रवाशांची मुक्तता होण्यासाठी Seat Availability Forecast हे एक महत्त्वाचं पाऊल आहे.”

प्रवाशांसाठी फायदेशीर

या फिचरमुळे प्रवाशांना वेळेत आणि माहितीच्या आधारावर निर्णय घेता येणार आहे. प्रवासाचं नियोजन सुकर होईल, अनावश्यक ताण टाळता येईल आणि वेटिंग लिस्टमधून प्रत्यक्ष प्रवास करणाऱ्यांची संख्या कमी होण्यास मदत होईल.

एकंदरीत MakeMyTrip चं हे नवीन पाऊल डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून रेल्वे प्रवास अधिक नियोजित आणि प्रवाशांच्या गरजांशी सुसंगत बनवण्याचा एक उत्कृष्ट प्रयत्न ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! बिहारमध्ये NDA मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला? कोणत्या पक्षातून किती मंत्री होणार? 'या' दिवशी शपथविधी सोहळ्याची शक्यता

Asia Cup, IND A vs PAK A: वैभव सूर्यवंशी, नमन धीर पाकिस्तानविरुद्ध बरसले! भारताने विजयासाठी ठेवलं 'इतक्या' धावांचं लक्ष्य

Viral Video: 91व्या वर्षीही करतात 12 तास ड्यूटी! फिट राहण्याचं सिक्रेट विचारताच आजोबांनी दिलं असं काही उत्तर...नेटकरीही झाले थक्क

Solapur Political : मंगळवेढ्यात काँग्रेसचा पंढरपूरप्रमाणे आघाडीसोबत लढण्याचा पॅटर्न!

मेडिक्लेम पॉलिसी घेताना अर्ज व्यवस्थित भरून देणे गरजेचे; अपुऱ्या अर्जामुळे...

SCROLL FOR NEXT