Maruti Swift Mocca Cafe Edition esakal
विज्ञान-तंत्र

Maruti Swift Mocca Cafe Edition : मारुती सुझुकी स्विफ्ट आता नवीन एडिशनमध्ये लाँच, फिचर्स अफलातून

या नव्या कारचे फिचर्सही अफलातून

साक्षी राऊत

Maruti Swift Mocca Cafe Edition : मारुती सुझुकीची हॅचबॅक कार स्विफ्टला देशांतर्गत बाजारात खूप पसंती दिली जाते. बरेच दिवस ग्राहक या कारच्या नवीन एडिशनची वाट पाहत होते. दक्षिण कोरियाची वाहन निर्माता कंपनी सुझुकीने बँकॉक इंटरनॅशनल मोटर शोमध्ये स्विफ्टची मोक्का कॅफे एडिशन लॉन्च केली.

हे स्विफ्टचे लिमिटेड एडिशन मॉडेल आहे, जे कंपनी केवळ थायलंडमध्ये विकणार आहे. या नवीन एडिशनची किंमत 637,000 baht (भारतीय रुपयांनुसार सुमारे 15.36 लाख) आहे, म्हणजे ती नॉर्मल स्विफ्टपेक्षा महाग आहे. नव्या कारच्या फिचर्सबद्दल बोलायचे झाल्यास आधीच्या कारपेक्षा ते बरेच चांगले आहेत. कंपनी 2005 पासून ही कार भारतात विकत आहे. आत्तापर्यंत या कारचे अनेक अपडेट्स बाजारात आले आहेत.

स्विफ्ट मोका कॅफे एडिशन डिझाइन

स्विफ्टच्या या नवीन एडिशनच्या डिझाईनबद्दल सांगायचे तर, या कारमध्ये डॅशिंद फ्रंट लिप स्पॉयलर, फॉग लाइट्सच्या वर एलईडी डीआरएल आणि अधिक डॅशिंग आणि स्पोर्टी लुकसह बॉडी क्लॅडिंगचा समावेश करण्यात आला आहे. जे समोरच्या स्पॉयलरपासून व्हिल आर्च आणि मागील बंपरपर्यंत आहे. याशिवाय, ट्विन फॉक्स एक्झॉस्ट टिप्स आणि 17-इंच आफ्टर-मार्केट अलॉय व्हील त्याच्या मागील बाजूस उपलब्ध आहेत.

स्विफ्ट मोका कॅफे एडिशन फिचर्स

या कारच्या केबिनमध्ये नवीन ड्युअल टोन कलर कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. त्याच वेळी, कारच्या खालच्या भागाला वार्म पेस्टल तपकिरी रंग आणि त्याच्या छतावर मजबूत बेज रंग आणि ORVM देण्यात आला आहे. आतील भाग डॅशबोर्ड आणि दरवाजाच्या एलिमेंट्सवर पेस्टल ब्राऊन आणि बेज आणि तपकिरी नप्पा लेदर सीट अपहोल्स्ट्री आहेत. अँड्रॉइड ओएस सपोर्टेड 10 इंच इंफोटेनमेंट सिस्टीम या कारमध्ये इंटीरियरशी जुळून आहे.

स्विफ्ट मोका कॅफे एडिशन पॉवर ट्रेन

थायलंडमध्ये सादर केलेल्या स्विफ्टच्या या मॉडेलमध्ये 1.2L पेट्रोल इंजिन आहे, जे जास्तीत जास्त 83 PS पॉवर आणि 108 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. नवीन कारचे इंजिन E20 इंधनावर चालते, जे आता स्विफ्ट लाइनअपमध्ये अधिक इको-फ्रेंडली पर्याय आहे.

या कारशी करेल स्पर्धा

मारुती सुझुकीची ही हॅचबॅक कार भारतातील Hyundai Grand i10, Nios, Tata Tiago NRG BS6 आणि Tata Tiago CNG सारख्या कारशी स्पर्धा करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT